Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामरक्षेची कहाणी

Updated: सोमवार, 4 जानेवारी 2021 (09:47 IST)
परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे.
 
बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रा तील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी.
 
त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते. व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्या पासून निश्चित फायदा आहेच. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात.

प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा या प्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा.अनुष्ठान म्हटले की त्याच्या यम नियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्या शिवाय राहात नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे. 
राम राम!
आपण कधी विचार केला आहे का, की आपण "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो.
कारण
र = २७ वा शब्द. ( क ख ग घ ड..........) 
आ = २ रा शब्द. (अ आ..)
म = २५ वा शब्द शब्द. (अ आ............)
एकूण = ५४. 
राम + राम. ५४+५४ = १०८. आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.
ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो.....रामनाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= लक्ष्मण होते. नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्ती मध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणा मुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात, शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते. सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते.
 
रामरक्षेच्या एका श्लोका बद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे । 
रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः । 
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् । 
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।
 
या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत.
रामो=रामः(प्रथमा) रामं (द्वितीया), रामेण (तृतीया), रामाय (चतुर्थी), रामान्नास्ति= रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे (सप्तमी),भो राम (संबोधन). ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.

रामरक्षास्तोत्रम्‌ 
 
: रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच
एक वेगळा पैलू तुमच्या समोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?
 
रामनामकवच:
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती । 
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः । 
स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ । 
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । 
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः । 
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
 
असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्या साठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. 
 
रामरक्षा सिद्ध कशी करावी?
121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा...किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.

इतर फायदे: 
आपदामपहर्तारम.....हा श्लोक 1 लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे. प्रत्येक अवयवाचे स्वतन्त्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.
उदा:कौसल्याये दृशो पातु:.... हा श्लोक सतत म्हटल्याने... डोळ्यांचे विकार बरे होतात...
जय श्रीराम!!
 
-सोशल मीडिया

सर्व पहा

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments