शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (11:50 IST)

हनुमानाचे कोणते पाठ केल्याने काय फायदा होतो, मंत्र आणि उपाय जाणून घ्या

श्रीराम चरित मानसचे रचणारे गोस्वामी तुलसीदास ह्यांनी श्रीराम चरित मानस लिहिण्या पूर्वी हनुमान चालीसा लिहिली होती आणि हनुमानाच्या कृपेनेच ते श्रीरामचरित मानस लिहू शकले.
 
हनुमान चालिसाला वाचल्यावरच समजेल की हनुमानजी या कलियुगातील जागृत देव आहे, जे भक्तांचे सर्व कष्ट दूर करण्यासाठी ते त्वरितच आनंदी होतात. अट अशी आहे की भक्तांनी आपल्या कामाच्या प्रति सज्ज राहणे देखील आवश्यक आहे. गुन्हेगारांचा साथ तर कोणी देत नाही. चला तर मग आम्ही सांगत आहोत की हनुमानाजींच्या कोणत्या उपासनेने कशा प्रकारे दुःख दूर होतात.

* बजरंग बाण या संकटापासून वाचवतो -
बरेच लोक आपल्या व्यवहारामुळे लोकांना नाराज करतात, या मुळे त्यांचे शत्रू वाढतात. काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते. ज्या मुळे त्यांचे गुपित शत्रू देखील असतात. हे देखील शक्य आहे की आपण सर्वोपरीने चांगले आहात तरी देखील लोक आपल्या प्रगतीचा हेवा करीत असतील आणि आपल्या विरोधात काही न काही कट कारस्थान रचित असतील. अशा मध्ये जर आपण प्रामाणिक आहात तर हे बजरंगबाण आपल्याला वाचवतो आणि शत्रूंना शिक्षा देतो. बजरंग बाण ने शत्रूंना त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा मिळते. परंतु हे पाठ एकाच ठिकाणी बसून विधियुक्त 21 दिवस पर्यंत वाचन करावे आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प घेतला पाहिजे, कारण हनुमानजी केवळ पवित्र लोकांना साथ देतात. या पाठाचे पठण केल्याने त्वरितच 21 दिवसात फळ मिळतो.

* हनुमान चालीसा वाचल्याने या संकटापासून वाचतो -  
जी व्यक्ती दररोज सकाळ आणि संध्याकाळ हनुमान चालिसाचे पठण करते त्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही. त्याच्या वर तुरुंगाचे संकट कधीही येत नाही. जर एखाद्या माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंग भोगावे लागत असल्यास तर त्याला संकल्प घेऊन आपल्या केलेल्या कृत्याची क्षमा मागितली पाहिजे आणि पुढे असे कृत्य कधीही न करण्याचे वचन देऊन हनुमान चालिसाचे 108 वेळा पठण केले पाहिजे. हनुमानजींची कृपा दृष्टी मिळाल्यावर असे माणसे देखील तुरुंगातून मुक्त होतात.
 
* हनुमान बाहुक चे पठण कोणत्या संकटातून वाचवतात -
जर आपण संधिवात, वात, डोकेदुखी, घसादुखी, सांधे दुखी इत्यादी वेदनेने त्रस्त आहात, तर पाण्याच्या एका भांड्याला समोर ठेवून हनुमान बाहुकचे 26 किंवा 21 दिवसापर्यंत चांगले मुहूर्त बघून पठण करावे. दररोज ते पाणी पिऊन दुसरे पाणी ठेवा. हनुमानाची कृपा मिळाल्याने शरीरातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल.
 
* या हनुमान मंत्रामुळे सर्व प्रकारची भीती नाहीशी होते -
जर एखाद्याला अंधाराची, भूत-प्रेताची भीती वाटत असल्यास हं हनुमंते नम:'
चे रात्री झोपण्याच्या पूर्वी हात -पाय आणि कान-नाक धुऊन पूर्वीकडे तोंड करून या मंत्राचे 108 वेळा जाप करून झोपावे. काहीच दिवसात हळू-हळू भीती कमी होऊन निर्भयता संचारेल.
 
* घरातील कलहामुळे त्रस्त असाल तर हे उपाय करा-
दररोज मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाच्या देऊळात जाऊन गूळ आणि हरभरे अर्पण करा आणि घरात सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसाचे पठण करावे. पठण करण्याच्या पूर्वी आणि नंतर किमान अर्धा तास कोणाशीही बोलू नये. 21 दिवस पूर्ण झाल्यावर हनुमानजींना चोळा अर्पण करा. असं केल्याने घरात सुख आणि शांती येते.
 
* शनी ग्रहांपासून त्रस्त आहात तर हे करा -
हनुमानजींची कृपा ज्याचा वर होते त्याचा शनी आणि यमराज देखील काहीही वाईट करू शकत नाही. शनी ग्रहाच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी दर मंगळवारी हनुमानाच्या देऊळात जावे आणि मांस आणि मद्या पासून लांब राहावे. या व्यतिरिक्त शनिवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनी भगवान आपल्याला लाभ देण्यास सुरुवात करतील या मुळे शनी ग्रहा पासून मुक्ती मिळेल. 
 
* हनुमानजींचे चमत्कारिक शाबर मंत्र -
हनुमानजींचे शाबर मंत्र खूपच सिद्ध मंत्र आहे. ह्याच्या प्रयोगाने हनुमानजी त्वरितच मनातले ऐकतात. ह्याचे वापर तेव्हाच करा जेव्हा ही खात्री आहे की आपण पवित्र आहात. हा मंत्र आपल्या जीवनातील सर्व संकटांना आणि त्रासांना चमत्कारिक रूपाने संपविण्याची क्षमता ठेवतो.हनुमानाचे अनेक शाबर मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्र वेगवेगळ्या कार्यासाठी आहे इथे दोन मंत्र देत आहोत -
 
साबर अढाईआ मंत्र-
॥ ॐ नमो आदेश गुरु को, सोने का कड़ा,
तांबे का कड़ा हनुमान वन्गारेय सजे मोंढे आन खड़ा ॥

शाबर मंत्र-
ॐ नमो बजर का कोठा,
जिस पर पिंड हमारा पेठा।
ईश्वर कुंजी ब्रह्म का ताला,
हमारे आठो आमो का जती हनुमंत रखवाला।
 
चेतावणी - या मंत्राचा जप करण्याचे नियम, वेळ, ठिकाण आणि मंत्र जाप संख्या आणि दिवस हे एखाद्या योग्य पंडिताला विचारूनच करावे.