Marathi Biodata Maker

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

Updated: गुरूवार, 21 मे 2026 (16:26 IST)
देहवात :- आपल्या डोक्यावर टाळुपासून ते पायाच्या अंगठ्या पर्यंत ची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची 108 किंवा 365 पदरी वात करतात व ती तेलात भिजवून ज्याच्या मापाची केलीय त्या व्यक्तीने लावायची असते. 
ब्रम्हांडवात :- आपल्या कपाळावर कुंकू लावतो त्या जागेपासून पुर्ण डोक्याला फेर घेऊन ते मोजून तेवढ्या लांबीची 250 पदरी वात बनवतात व ज्याच्या मापाची आहे त्यांचे हातून तीळ तेलात भिजवून लावतात.
 
काकडा :- कपड्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्या वाती करून काकड आरतीला लावायच्या... 
 
रथसप्तमी :- ला 7 पदरी
कृष्णाला 8 पदरी
रामनवमीला 9 पदरी 
दशावतारीवात विष्णूला -- 10 पदरी
शंकराला 11 पदरी
सूर्याला 12 पदरी
वैकुंठ चतुर्दशी ला 14 पदरी
गणपतीला 21 पदरी
 
हे सगळे वर्षभर करायचे असेल नेम म्हणून तर त्या त्या दिवसापासून परत त्या दिवसापर्यंत व्रत करतात करणारे...जसे रथसप्तमी ते रथसप्तमी.... गोकुळष्टमी ते गोकुळाष्टमी...
 
वरील सगळ्या वाती वसा काढूनच करतात... आणि जितकी पदरी पाहिजे तितके पदर गुंडाळायचे....फक्त जोडवाती म्हणजे एकाला एक दोन वाती जोडायच्या म्हणजे एक पूर्ण झाली की न तोडता दुसरी करायची...3 पदरी असते ही वात... 3+3 पदर...
 बेलवाती पण एकाला एक जोडून 3 वाती... 4,4,3 पदरी...
 
- सोशल मीडिया
About Author
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते..... Read More

सर्व पहा

Jyeshtha Gauri 2026 ज्येष्ठा गौरी आवाहन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि या तीन दिवसांमागची कथा

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

अनंत चतुर्दशी २०२६ कधी आहे? या दिवशी अनंत सूत्र बांधण्याची परंपरा आहे, या १४ गाठी कशाचे प्रतीक?

Santan Saptami 2026 १८ सप्टेंबर रोजी संतान सप्तमी, पूजा पद्धत, नियम आणि व्रताची कथा

दुकानातील मिठाई आणणे टाळा! घरीच बेसन वापरून १० मिनिटात मोतीचूर लाडू बनवा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments