Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग १२

Updated: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:53 IST)
 
३८ सारांश
॥ नारायणू सारे । नरु रूपें आले । करणीनें नरू । नारायणू ॥५२॥
॥ नमेउनच्या तीरी । मच्छिंदत जन्मू । भद्रागिरी वरी । समाधीत ॥५३॥
॥ जालधरू तेथें । जान पीरू होई । गहिनीहि तेथें । गैबी पीरू ॥५४॥
॥ गोरक्षुहि तेथें । रेवणु विटयासी । इतर रहाती । गुप्त वेषें ॥५५॥
॥ वायु आकर्षणु । तोची प्राणायामु । विजयाचा मार्गू । देवांवरी ॥५६॥
॥ देहो कर्दमाचा । गोळा चिखलाचा । सुवर्णू तयाचे । तपस्येनें ॥५७॥
॥ देहाची कसोटी । मनाची पारखू । हीच ती किमया । मालू-साक्ष ॥५८॥
 
३९ भूमिका
 
॥ द्दढा भक्ति, आत्मशक्ति, मंत्री स्थिति, गुरु प्रसादू, ॥
॥ ईश - कृपा, पंच महती, कार्यकर्ता विजयो यांनी ॥५९॥
 
 
४० फल - श्रुति
 
॥ गोरक्षु सर्व किमयागारु, ग्रंथी गोवियेले साचारू ॥
॥ हर्षतील सश्रद्ध नरू, नाथ लीला अद्‌भुत ॥४६०॥
 
॥ आतां कथीन फले सारी, सार रूपें इथें आली ॥
॥ शत्रूनाश, समंध-बाधा, शत्रुमोहन, भूत, बाधा-शत्रुच्चाटण, ॥
॥ अग्नि-पीडा, दारिद्रयोच्चाटण, कलह - पीडा, कपट, नाशन, ॥
॥ रोग - पीडा, हरती पठणे - “लीलामृते” ॥६१॥
॥ धन, विद्या, विजय, पुत्र, कारामुक्ति, ॥
॥ कलह - शांति, योगसाधन, मोक्षही ॥६२॥
ॐ नमो जी अवधूता । आद्य श्रीमच्छिंद्रनाथा ।
श्रीगुरुंचा प्रसाद होतां । सर्व कार्ये साधती ॥६३॥
नमुनि गोरक्षनाथासी । नित्य लक्षी उपासनेसी ।
आंस त्याची निश्चयेसी । पुरवी श्रीगुरु सर्वदा ॥६४॥
ऐका दोन मंत्रांची महती । अक्षरें अठरा एका असती ।
पहिला जो ‘दिगंबरा’ इत्यादि । दुसरा ‘द्रां’ दत्तायेय नम: ॥६५॥
अठरा अक्षरी मंत्राचा जप बावीस सहस्त्रांचा ।
तर्पण नेम दशांशाचा । द्विशतवीस हवनार्थ ॥६६॥
दुसरा वज्रकवचांतील । अष्टोत्तरशत जो जपील ।
मंत्र कवचाविना निष्फळ । नित्य कवचाचा पाठ करा ॥६७॥
जो भक्त प्रतिदिवशी । वाची या लीलामृतासी ।
धाऊनि त्याच्या कार्यासी । अष्टसिद्धी पळताती ॥६८॥
नित्यनेम ज्याचा आहे । किमयागिरी काव्यप्रवाहे ।
नवनाथ लीलामृत हे । सर्वसिद्धी ओपीतसे ॥६९॥
जो कोणी भक्तश्रेष्ठ । लीलामृती एकनिष्ठ ।
नाथ त्याचे सर्व कष्ट । हरण करिती तात्काळ ॥७०॥
धरुनिं कांहीं कामनेसी । वाचील काव्यप्रवाहासी ।
वर्षपर्यन्त त्या भक्तासी । नाथ आशीर्वाद लाभेल ॥७१॥
गुरुवारा शुभ पाहुनी । आरंभ करावा यामिनी ।
शद्ब कांहीं पडतां कानी । निर्भय चित्ती वाचावें ॥७२॥
पाठाची जवं सिद्धी होई । ध्वनि ‘अलक्ष’ कानी येई ।
शुभाशुभ सांगती स्वप्नी । नाथ वचन ऐकावें ॥७३॥
कार्यासाठीं निघे साधक । नाथां पुष्प वाहूनि एक ।
आमंत्रुनी जाईल देख । कार्य सफल होतसे ॥७४॥
जरी कांही चेटुक करणी । करील कुणी अद्दश्यपणी ।
नाथकृपेनें त्याचीच झणी । पीडा परस्पर टळतसें ॥७५॥
कार्य कैसेही असो महान । दैवतां घाला नाथांची आण ।
आपुली वचनें आठवून । तात्काळ कार्यार्थ जातील ॥७६॥
कानीफ नाथ गोपीचंदनार्थ । तैसी दैवतें भक्तहितार्थ ।
कार्य साधावया समर्थ । वचनी नाथें गुंतविली ॥७७॥
या ग्रंथाचे पठण सर्वदा । करील त्याच्या सर्व आपदा ।
जाऊनि, त्या मिळती संपदा । अनुभवें सत्य कळेल ॥७८॥
 
समाप्त

सर्व पहा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

Rakhi Muhurat: २८ ऑगस्ट २०२६: राखी बांधण्याची शुभ वेळ आणि चंद्रग्रहणाबाबतचे सत्य

श्रावणातील वरदलक्ष्मी व्रत आणि पूजा संपूर्ण माहिती

Rakshabandhan Special शाही आणि चवदार मिठाई पाककृती ''काजू चकली''

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments