Marathi Biodata Maker

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ९

Updated: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:48 IST)
॥ विक्रम तो जाणा । सत्यवती पुत्रू । गंधर्वाचा सुतू । कुंभा-गेही ॥४४॥
॥ दुर्गाचा रक्षकू । क्रमी वृत्ति ऐसी । मारोनी राक्षसु । रत्नें आणी ॥४५॥
॥ दुर्गाचिये द्वारी । हत्ती मालाधारी । विक्रमु वरीला । राज्यकर्ता ॥४६॥
॥ विक्रमु कुलालु । गंधर्वाचा पुत्रू । भर्तरी रानीलु । भ्राता मानी ॥४७॥
॥ वाडीयांत राजा । विक्रमु जो दूतु । मंत्रीयांत शोभे । भर्तरी तो ॥४८॥
॥ मंत्रियाची कन्या । भर्तरीची । भार्या । पिंगला नामे या । शोभतसे ॥४९॥
॥ भर्तरी विद्येसी । विक्रमु शौर्येसी । जनीं आदरेंसी । वागविती ॥५०॥
॥ मेधावती कन्या । स्वयंवरु मांडी । राजयाची लेक । विक्रमासी ॥५१॥
॥ राज्य वोपी राजा । जामातासी प्रेमे । भर्तरी तयाचा । मंत्री होई ॥५२॥
 
२७ पिंगला सती
 
॥ विक्रमू राजया । भर्तॄहरी तेंवी । क्रिडनाची गोंवी । दोघांसीहि ॥५३॥
॥ मृगया क्रीडना । भर्तूहरी जाई । शिणवीली काया । घोरा रानी ॥५४॥
॥ तृषार्तू फिरे तो । रानां वनांतूनी । जलावीणू मीनू । तळमळे ॥५५॥
॥ दत्त गुरु त्यासी । रानी दिसूं लागे । ‘तपस्येसी भागे । क्रीडा सोडी ॥५६॥
॥ सांगे गुरु राणा । भर्तृहरी मना । नच कांहीं येना । जलावीणू ॥५७॥
॥ आणा भाका घेई । ‘बारा वरुषांनी । तपांसी येईनू । तुझ्या पायीं ॥५८॥
॥ राज्यीं परतोनी । पिंगलेसी भेटे । दिनीं दिनीं तेथें । प्रेमा दाटे ॥५९॥
॥ फिरोनी निघाला । मृगया क्रीडना । मृगी थोरू घाला । घालीताहे ॥६०॥
॥ माथा मुगुटीचा । रक्ती मिजवोनी । पिंगलेसी दूतू । घाडियेला ॥६१॥
॥ पिंगलेसी वाटे । नाथावरी धाडी । मृत्यु पंथे पडे । सती जाई ॥६२॥
॥ मस्करी कुस्करी । भर्तंरीसी भोवे । दु:खासी तयाच्या । पार नसे ॥६३॥
॥ स्मशानी तो जाई । रक्षेपाशी बैसे । पिंगलेच्या ध्यानी । दु:खी कष्टी ॥६४॥

सर्व पहा

Rishi Panchami 2026: १५ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि व्रतकथा

संत गजानन महाराज निर्वाण दिन: "गण गण गणांत बोते"च्या जयघोषात विसावलेला साक्षात्कार

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

Rishi Panchami Aarti Marathi Lyrics ऋषी पंचमी आरती मराठी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments