गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ४

९ मीननाथ दर्शन
 
॥ गहीनीसी मागे । कनका या ग्रामी । ठेवोनियां स्वामी । गोरक्षजा ॥१९॥
॥ करवी गोरक्षा । तप केदारासी । तेथें शिवपदी । वाहीयेला ॥२०॥
 
॥ स्थानी स्थानी यात्रा । मच्छिंदरू चालला । रामेश्वरी आला । हनूमंतू ॥१॥
॥ पुराण तो योगी । मच्छिंद्रा सांगती । घेवीनीयां चाले । कामरूपा ॥२॥
॥ राज्य तेथें चाले । स्त्रिया कर्मी दंग । कोणी मैनाकीनी । राणी तेथें ॥३॥
॥ मच्छिंदरू राजा । अन्त:पुरी योगी । मैनाकिनी पोटी मीननाथू ॥४॥
॥ मीनू मच्छिंदरू । मूर्तू नारायणू । नाथ-पंथी राज्य । चालतसे ॥५॥
॥ हनूमंतू-कार्यी । मच्छिंदर योगी । भु.भु:कारे रक्षी । रामदूत ॥६॥
 
१० जालंदर दर्शन
 
॥ जालंधर जन्मू । कथूं योगू आतां । ज्वाला-जालीं जाई । काम राजा ॥७॥
॥ प्राचीना कथा ही । पुराणी जाणावी । शंकरासी काम । बाधा जधीं ॥८॥
॥ शिव चिंती मनीं । तृतीय नेत्रानें । ज्वाला माजी काम । राजा जाळू ॥९॥
॥ ज्वाला रूपें राही । मदन-मन्मथू । रती रूपें राही । ज्वाला माला ॥१०॥
 
॥ स्वाहा स्वधा । एकी । प्रकटती यज्ञी । युति तेजाळे ती । ज्योतिर्मति ॥१॥
॥ जातवेदो जाणा । ज्वालामाली शिवू । शक्ती प्रकटती । यज्ञी-कुंडी ॥२॥
॥ कवीची कीमया । ज्वालेसी चैतन्यू । कल्पोनी कवनी । ज्वालेंद्रातें ॥३॥
॥ पुत्र-पौत्र-ज्योति । स्वयेंचि जगती । कां या दर्पणासी । दुजा लागे ॥४॥
॥ हस्तिनापुरांतु । बृहद्रवा वंश । यज्ञ कुंडा आंतु । जालंधरू ॥५॥
॥ जन्मतां विरागी । गृह त्यागु करी । विवाह प्रसंगे । राही रानी ॥६॥
॥ भक्षिताती ज्वाली । रानी सर्व प्राणी । रक्षिताती पुत्रा । जालंधरा ॥७॥
॥ दत्त दर्शनाचा । रानी लाहो त्यासी । लावी तपाभ्यासी । श्रेष्ठ-राजा ॥८॥
 
॥ संसारीहि तापु । तापु तेंवि रानी । तेणें जालंधरू । इंद्रा सम ॥९॥
॥ तत्रापि यात्रार्थी । येई भागीरथी । नमनार्थी येई । काशीपुरी ॥१०॥
॥ भिक्षा कोल्हापुरी । पांचांलयी जेवी । मातापुरी निद्रा । भ्रमतु तो ॥४१॥
॥ दत्तात्रयें त्यासी । विद्या ज्ञानें कला । तैसी आराधना । कथीयेली ॥४२॥
॥ शस्त्रास्त्रांची विद्या । नाटया-गान-कला । अद्वैती प्रवोधू । जालंधरू ॥४३॥
॥ बद्री केदारासी । तापसी आराधी । धुंडीता स्थानांसी । मौज दावी ॥४४॥
 
११ कानीफा
 
॥ हिमराजी जेथें । स्थली स्थली देखें । नील कृष्ण कोठे । शुभ्र माथा ॥४५॥
॥ धुंडी सुत मालू । कवी सांगताहे । त्यासी गज मानी । दिग्गज जो ॥४६॥
॥ विवरी तयाच्या । बालार्क बालक । कानीफ तापसी । तपतसे ॥४७॥
॥ वयें वर्षे सोळा । कैसा एथें आला? । विवरांत केवीं । तपी झाला ॥४८॥
॥ त्यातें पुसोनियां । विद्या मंत्रे दानें । शिष्य तो सन्मान । संगे नेतू ॥४९॥
॥ देवांसी पाचारी । मागे वरदानू । देव जालंधरा । वर - दाते ॥५०॥
॥ दान तैसे शिष्या । ऐसें प्रार्थीयेलें । देव नाराजले । युद्धार्थी ते ॥५१॥
॥ हारीलें देवांसी । वस्त्रें हिरोनियां । दीन जालंधरे । देवें केले ॥५२॥
॥ ज्वालेंद्रें मन्मथें । शाबरी कर्तृत्वें । कवित्व देवांतें । प्राशीयले ॥५३॥
॥ त्रिवार तें मान्य । देवां जधी होई । वस्त्री आभरणी । पूजी देवां ॥५४॥