Dharma Sangrah

मल्हारी मार्तंड विजय अध्याय दुसरा

बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:15 IST)
श्रीमार्तंडभैरवाय नम: ॥ मग धर्मपुत्र साती ॥ कुटुंब ठेवोनि अन्य पर्वतीं ॥ जाते झाले अमरावती ॥ सुधर्मं सभा देखिली ॥१॥
रत्नजडिंत सिंहासन ॥ वरि बैसला सहस्त्रनयन ॥ बृहस्पति आदि ऋषि जन ॥ सभे माजीं असती ॥२॥
अग्नि यम नैऋत्य ॥ वरुण वायू मूर्तिमंत ॥ चंद्र सूर्यादि दैवत ॥ उभे कर जोडोनी ॥३॥
नाग सिध्द चारण ॥ रंभानृत्य गंधर्वगायन ॥ कुबेर नवविधि हस्तें कडोन ॥ सेवा करी ॥४॥
चामर ढाळिती मृगनयनी ॥ धर्मपुत्र देखिले नयनीं ॥ तटस्थ होऊनी मनीं ॥ सन्मुख उभे राहिले ॥५॥
शक्र द्विजास पाहोन ॥६॥
मुख तुमचें लहान जाहलें ॥ कवणे तुम्हांसी गांजिलें ॥ आणि वृत्तांत काय जाहले ॥ ते सांगा मज ॥७॥
ऋषि म्हणतीं शक्रालागुन ॥ तुझे अभय, वरदे कडोन ॥ मणिचूल पर्वतीं अनुष्ठान ॥ सुखें कडोन करीत होतों ॥८॥
मृगयाचें निमित्य ॥ येवोनिया मल्लदैत्य ॥ नासिले आश्रम समस्त ॥ म्हणोनि तुज सांगो आलों ॥९॥
त्यांसि पारिपत्य करावें ॥ हाचि आमचा मनोभाव ॥ आम्ही स्वधर्म आचरावे ॥ म्हणोनिया श्रुत केलें ॥१०॥
शक्र म्हणे द्विजोत्तमा ॥ तो मल्ल नाटोपें आम्हां ॥ धूम्रपान करोनिया ब्रह्मा ॥ तोषविला त्यानें ॥११॥
तुम्हीं सर्वही मिळोन ॥ जो वैकुंठनाथ भगवान ॥ त्यासी जावें शरण ॥ त्याचे कडोन कार्य होय ॥१२॥
ऐकोनि ऋषि तोषले ॥ म्हणति शक्रा सत्य बोलिले ॥ शरण जाऊं अनन्यभावें ॥ साह्य होईल आम्हांसि तो ॥१३॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१४॥
श्री माणिकप्रभुकृतटीकायां शक्राभिगमनोनाम द्वितीयोऽध्याय गोड हा ॥२॥
ALSO READ: मल्हारी मार्तंड विजय अध्याय तिसरा

सर्व पहा

Budh Stotra लक्ष्य साध्य करण्यासाठी बुध स्तोत्र पाठ

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

बाथरूममध्ये सत्संग ऐकणे पाप की पुण्य? जाणून घ्या प्रेमानंद जी महाराजांचे आश्चर्यकारक उत्तर

Raksha Bandhan 2026 Date : रक्षाबंधन कधी ? भावाला राखी बांधण्याची योग्य वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजेची संपूर्ण माहिती

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments