Dharma Sangrah
✕

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १२

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:34 IST)
 
त्या समयी जालंदराने कामिनीअस्त्र सोडिले; तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली. तेणेकरून देव कामातुर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्रकटाक्षबाण सोडीत होत्याच. त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत पाठीमागून जात; असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या. त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवहि चढले इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रगट होऊन गेले. तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले. कित्येकांची डोकी खाली व पाय वर अशी दशा होऊन ते लोंबू लागले. तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले; इतक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊ त्यास नग्न केले व जालंदरनाथापाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीग केला.
 
मग जालंदरनाथाने कानिफास इषार्‍याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले. यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला. आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चात्ताप होऊन अतिशय दुःख झाले. त्यास कानिफा म्हणाला, मी गुरूच्या नकळत तुम्हास वस्त्रे नेसवीत आहे, पण ही गोष्ट गुरूना सांगू नका. तो दरएक देवास वस्त्र नेसवून त्याच्या पाया पडे. याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ति पाहून देव समाधान पावले व त्यानी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रांत आम्ही सर्वप्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले. मग जालंदरनाथाने विभक्त अस्त्र सोडले. तेव्हा सर्व देव झाडास चिकटले. होते तेथून मुक्त झाले व अस्त्रेभूषणे सावरून जालंदरनाथाजवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू, असा कानिफात वर दिल्याबद्दल कळविले. तेव्हा जालंदराने सर्वांस सांगितले की, पुढे मी साबरीकवित्व करणार आहे; त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी साह्य व्हावे. त्यास त्यानी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले. नंतर हरिहर, जालंदरनाथ व कानिफनाथ तीन दिवस बदरिकाश्रमात राहिले.

सर्व पहा

मां ब्रह्मचारिणी आरती : जय अंबे ब्रह्माचारिणी माता

शारदीय नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कथा, मंत्र आणि पूजा पद्धत

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

चतुरशृंगी टेकडीवर वसलेले जागृत श्री चतुरशृंगी देवी मंदिर पुणे

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments