गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Vat Savitri Purnima 2023 वट सावित्री पौर्णिमा पूजा मुहूर्त

vat purnima upay
वट सावित्री पौर्णिमा व्रत हा महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. उत्तर भारतात भाविक ज्येष्ठ अमावस्येला उपवास करतात, तर दक्षिण भारतात लोक ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी उपवास करतात. वट सावित्री व्रतामध्ये विवाहित स्त्रिया उपवासासह वट सावित्री व्रताची कथा ऐकतात आणि त्यानंतर त्या वटवृक्षाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. यावेळी वट सावित्री पौर्णिमेला 3 शुभ योग तयार होत आहेत. वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळ आणि दुपारचे शुभ मुहूर्त असतात. वट सावित्री पौर्णिमा तिथी, पूजा मुहूर्त आणि शुभ योगांबद्दल जाणून घेऊया.
 
वट सावित्री पौर्णिमा व्रत 2023 तारीख
ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुरू होते: 3 जून, शनिवार, 11:16 वाजता
दुसऱ्या दिवशी तिथी समाप्त होते ज्येष्ठ पौर्णिमा तिथी: 4 जून, रविवार, 09:11 वाजता
अशात 3 जून रोजी वट सावित्री पौर्णिमेचे व्रत पाळले जाणार आहे.
 
वट सावित्री पौर्णिमा 2023 पूजा मुहूर्त
पूजेसाठी शुभ वेळ: 3 जून, शनिवार, सकाळी 07:07 ते 08:51, 
पूजेसाठी दुपारची शुभ वेळ : 12:19 ते संध्याकाळी 05:31
लाभ-प्रगतीचा मुहूर्त: दुपारी 02:03 ते दुपारी 03:47
अमृत-उत्तम मुहूर्त: दुपारी 03:47 ते संध्याकाळी 05:31
वट सावित्री पौर्णिमेला 3 शुभ योग
वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 3 जून, शनिवार, 3 शुभ योग तयार होत आहेत.
शिवयोग : सकाळपासून दुपारी 02:48 पर्यंत.
सिद्धी योग: दुपारी 02:48 ते संपूर्ण रात्र.
रवि योग: सकाळी 05:23 ते 06:16 पर्यंत
 
वट सावित्रीचे महत्त्व
ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन सर्वोच्च देवतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वट किंवा वटवृक्षाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे सावित्रीने आपल्या पतीला मृत्यूच्या मुखातून परत आणले त्याप्रकारे विवाहित स्त्रियांनी हे व्रत पाळल्याने त्यांना सौभाग्य प्राप्त होतं आणि पतीला दीघार्युष्य प्राप्त होतं असे मानले जाते.