Festival Posters

विदुर नीती : या 3 स्वभावाच्या लोकांच्या आयुष्यात धनागमन होत नाही

गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (16:01 IST)
महाभारतातील महत्त्वाचे पात्र महात्मा विदुर यांनी रचलेले नीतीची पुस्तके विदुरनीती हे आहे. या मध्ये लोकांच्या कल्याणासाठी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. असे म्हणतात की महात्मा विदुरांचे धोरण आणि भगवान श्रीकृष्ण बरोबर असल्याने पांडव महाभारताचे युद्ध कौरवांचा पराभव करून जिंकू शकले. विदुरच्या धोरणानुसार, ज्या लोकांमध्ये काही विशिष्ट वाईट सवयी असतात त्यांच्यावर आई लक्ष्मी कधीच कृपा करीत नाही. असे लोक नेहमीच पैशा साठी तळमळतात.
 
1 आळशी -
विदुर म्हणतात की आळशी लोकांवर कधीही लक्ष्मी कृपा करीत नाही. अशा लोकांना नेहमी नशिबासाठी रडावे लागते. महात्मा विदुर म्हणतात की जे लोक आळशी असतात, ते लोक स्वतःचेच  वाईट करण्यासाठी कारणीभूत असतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा वैरी मानला आहे.आळसच दारिद्र्य आणतो. जे लोक आळशी असतात त्यांना आपल्या आयुष्यात धनाचा अभाव सहन  करावा लागतो.
 
2 कामचुकार लोक -
विदुर म्हणतात की कठोर परिश्रम हीच यशाची पायरी असते. पण जे लोक कामाचा कंटाळा करतात,त्यांच्या कडे कधीही पैसे येत नाही. काही लोक अशी असतात ज्यांना बसूनच प्रगती,यश आणि काम मिळवायचे असते. पण खरं तर त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे खूप आवश्यक आहे. जे लोक परिश्रम करीत नाही त्यांचा वर ईश्वर देखील कृपा करीत नाही.
 
 
3 देवावर विश्वास न करणारे -
विदुर म्हणतात की जे लोक देवावर विश्वास करीत नाही त्यांच्या वर ईश्वराची कृपा होत नाही. असे लोक दारिद्र्यात आपले आयुष्य घालवतात. माणसाला नेहमी देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. दररोज आपल्या मनात भगवंताचे स्मरण करा. शक्य असल्यास घरात धुपकांडी आणि दिवा लावावा.

सर्व पहा

सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी या गोष्टी करणे टाळले पाहिजे

वट पौर्णिमा २०२६: विवाहित महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काय करावे?

Vat Purnima 2026 Wishes in Marathi वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments