Festival Posters

कायदा निर्विवाद श्रेष्ठ

Updated: बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (12:05 IST)
 
कायदा आंधळा नसतो हेच सिद्ध होते. भ्रष्टाचार, अंदाधुंदी व गुन्हेगारीकरणाची तुलना प्रस्थापित न्यायव्यवस्थेशी केल्यास गुन्ह्यांची हजारो प्रकरण सापडतील. मात्र, न्याय व धाडसी निर्णयाची निवडक उदाहरणेही निश्चितच सापडतील. हे निवडक निर्णयच देशाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आपल्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिल्यास वैश्विक समुदायाची भारतीय लोकशाहीवरची निष्ठा निश्चितच वाढली असणार.
 
'वाचडॉग'ची भूमिका निभावणार्‍या तहलकासारख्या स्टिंग ऑपरेशनद्वारे प्रभावशाली व्यक्तींच्या चेहर्‍यावरील बुरखे उतरवून देशातील नागरिक व पत्रकार खडा पहारा देऊन असल्याचेच सिद्ध केले आहे. आश्चर्याने तोंडात बोटे घालण्यास भाग पाडणार्‍या या धाडसी कारवायांत फक्त पुरूषच नाहीतर महिलासुद्धा आघाडीवर आहेत. एका तरूण महिला पत्रकाराने हर्षद मेहता प्रकरण उघडकीस आणले होते.
 
शीतपेयांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशक असल्याचे प्रकरणही एका महिलेनेच समोर आणले. हवाला, बोफोर्स, तेलगीचा भ्रष्टाचार यासारख्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय नेते व पक्षांवर कायद्याच्या विजयाने देशाची मान ताठ केली आहे. यातून अंदाधुंदी व भ्रष्टाचाराचे साम्राज्य असले तरी सर्वांवर नियंत्रणासाठी कायदा समर्थ असल्याचेच सिद्ध झाले आहे. देशाअंतर्गत किंवा सीमांपार कितीही कारस्थाने रचली गेली भारताचे श्रेष्ठत्व अखंड निनादत राहणार. कारण या देशास पाच हजार वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. प्रगती व सुधारणेची ही परंपरा निरंतर राहणार आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

मराठा आरक्षण आंदोलनावर फडणवीस यांचे भाष्य: गणेशोत्सवात व्यत्यय आणू नये

नागपूरमध्ये आईसोबत गौरी विसर्जनसाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

कुटुंब पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत! पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे चार जणांचे प्राण वाचले

पंजाब दिनानिमित्त जालंधरमध्ये भारत आणि पाकिस्तान हॉकी संघ आमनेसामने येणार

भिवंडीतील एका अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ दुचाकी जळून खाक

पुढील लेख
Show comments