शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

महात्मा गांधी हत्या : पुन्हा नव्याने तपास नाही

महात्मा गांधी यांची हत्या झाली त्याचा तपास पुन्हा होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. यामध्ये सरकार तर्फे  न्यायमित्रांनी (एमीकस क्युरी) यांनी  सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आपल्या अहवालात असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणासाठी  सर्वोच्च न्यायालयाने माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायमित्र म्हणून नेमणूक केली होती. यामध्ये न्यायमित्र यांनी गांधी हत्येशी  निगडीत विविध दस्तऐवजांचा पुन्हा  तपास केला होता. हा तपास पूर्ण करत त्यांनी गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केली आहे . शरण हवालात असे सांगतात की  महात्मा गांधीची हत्या नथुराम गोडसेनेच केली असून यात अज्ञात व्यक्तीचा हात नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने ‘अभिनव भारत’चे पंकज फडणीस यांच्या याचिकेवर शरण यांना तपासाचे  यासंबंधीचे निर्देश दिले होते. यामध्ये  महात्मा गांधी यांची हत्या एका अज्ञात व्यक्तीने केली असवी आणि  त्या अज्ञात व्यक्तीनेच ‘चौथी गोळी’ झाडली होती. या चौथ्या गोळीचे रहस्य कधी सुटलेच नाही, असा दावा करण्यात आला होता. त्यावर पुन्हा नव्याने याचा तपास व्हावा अशी मागणी फडणीस यांनी  याचिका दाखल केली होती.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शरण यांनी आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवला आहे. त्यामुळे आता पुन्हा कोणताही तपास होणार असून नथुराम गोडसेच गांधी यांचा हत्यारा आहे हे स्पष्ट झाले आहे.