शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 8 जानेवारी 2018 (12:18 IST)

नवा फतवा! मुस्लिमांनी कोळंबी खाऊ नये

'जामिया निजामिया' या इस्लामिक संस्थेने एक नवा फतवा काढला आहे. मुस्लिमांनी कोळंबी खाऊ नये, कोळंबी खाणे इस्लामला अमान्य आहे, असे त्यात म्हटले आहे. संस्थेचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद अझिमुद्दीन यांनी हा फतवा काढला असून त्याला अनेक मुस्लीम तरुणांनी विरोध केला आहे.
 
कोळंबी हा माशाचा प्रकार आहे. तिचे सेवन करणे मकरूह तहरीम (मुस्लिांसाठी निषिद्ध) आहे, असे मुफ्तींचे म्हणणे आहे. ' जामिया निजामिया'च्या फतव्याला जामिया-उलो-ए-हिंद या संस्थेने विरोध केला आहे. कोळंबीमध्ये रक्त नसते. तसेच कोळंबी हा माशाचाच प्रकार आहे. त्यामुळे ती खाण्यात काही गैर नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय काही उच्चशिक्षित मुस्लीम तरुणांनीही या फतव्याला विरोध केला आहे. फतवे काढून कुणावरही बंधने घालता येणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.