शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अगारताळा , सोमवार, 8 जानेवारी 2018 (12:08 IST)

त्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत असेल : शहा

त्रिपुरातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनित गाडून येत्या  मार्चमध्ये भाजप सत्तेत येईल, त्याचे काउंडाउन आजपासून सुरु झाले आहे, अशी घोषणा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अगारताळा येथे एका सभेत बोलताना केली.
 
शहा म्हणाले, त्रिपुरातील 37 लाख लोकसंख्येपैकी 7 लाखांपेक्षा जास्त लोकांची बेरोजगार म्हणून नोंद झाली आहे. आरोग्याच्या सुविधांचीही येथे कमतरता आहे. गेल्या 25 वर्षांपासून राज्यात हीच परिस्थिती कायम आहे.
 
तुम्ही हिंसाचाराचा कितीही चिखल तयार केला तरी, भाजप या हिंसाचाराला घाबरणार नाही, असे मी त्रिपुरातील माणिक सरकारला मी सांगू इच्छितो. तुमच्या या हिंसाचाराच्या चिखलापेक्षा येथे कमळ उगवलेले कधीही चांगले, अशा शब्दांत यावेळी शहा यांनी राज्य सरकारवर टीका केली.