सोमवार, 15 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2018 (09:22 IST)

पेटीएम देणार एफडीसारखा फायदा

paytm fd

ई-वॉलेट कंपनी पेटीएम आपल्या ग्राहकांच्या पेटीएम खात्यात जमा असलेल्या एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर करेल.  खास बाब म्हणजे ग्राहकांना या एफडी (फिक्स्ड डिपॉझिट)वर ६.८५ टक्के वर्षाला व्याज मिळणार आहे. म्हणजेच कुठल्याही बँकेच्या एफडी व्याजदरा इतका किंवा त्यापेक्षा अधिक पेटीएम आपल्या ग्राहकांना व्याजदर देणार आहे.या सुविधेची खास बाब म्हणजे युजर्स आपली रक्कम हवी तेव्हा काढू शकणार आहेत. यासाठी कुठल्याही प्रकारची अट ठेवण्यात आलेली नाहीये.

ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी)ची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकने इंड्सइंड बँकेसोबत करार केला आहे. ग्राहकाकडून जमा करण्यात आलेली रक्कम एक लाखांपेक्षा अधिक झाल्यास आपोआप ती रक्कम एफडीमध्ये बदलली जाईल असं कंपनीने म्हटलं आहे.