कुठलं पॅटर्न लॉक वापरताय?
मोबाईल लॉक करण्यासाठी वेगवेगळे पॅटर्न लॉक वापरले जातात. पॅटर्न लॉकमध्ये नऊ बिंदू असतात. त्यांचा वापर करून तुम्ही विविध पॅटर्न लॉक तयार करू शकता. सर्वसाधारणपणे वापरले जाणारे काही पॅटर्न लॉक आहेत. पण यामुळे तुमच्या फोनची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. म्हणूनच पॅटर्न लॉक थोडा कठीण असायला हवा. एस, यू, झेड, सी, एन, डब्ल्यू, व्ही ही अक्षरं पॅटर्न लॉक म्हणून वापरली जातात. असे पॅटर्न लॉक अनेकांचे असू शकतात. त्यामुळे तुम्ही यापैकी एखादा पॅटर्न लॉक ठेवला असेल तर तातडीने बदलून टाका.