मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (09:03 IST)

मोदींच्या निमंत्रणावर इवांका ट्रम्प भारतात येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रंम्प नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहे. इवांका येथे एका ग्लोबल एंटरप्रिन्योर समिटमध्ये सहभागी होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इवांका हैदराबादला पोहोचणार आहे. भारतात आठवे जीईएस सम्मेलन होत आहे. जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांनी इवांकाला भारतात येण्याचे  निमंत्रण दिले होते. त्यावेळेस इवांकाने देखील ट्विट करत निमंत्रण दिल्यामुळे आभार मानले होते.
 
जीईसीची सुरुवात २०१० मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. यावर्षी जीईएसचे आठवे सम्मेलन आहे. भारतासाठी या सम्मेलनाचं आयोजन करण्याची पहिली संधी मिळाली आहे. पीएम मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर भारताला या सम्मेलनाचं आयोजन करण्याची संधी देण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार कार्यक्रम भव्य करण्याच्या मागे कूटनीती आहे. यामुळे एच-1बी वीजाच्या बाबतीत भारताला फायदा होईल. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना देखील फायदा होईल.