मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2024 (13:20 IST)

इजरायल-हमास : राफा मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या इंटरनॅशनल स्टाफचा मृत्यू, भारताशी आहे कनेक्शन

Israel Hamas war
इजरायल-हमास युद्ध दरम्यान एक भारतीय व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. सांगितले जाते आहे की, हा व्यक्ती संयुक्त राष्ट्रासोबत काम करीत होता संयुक्त राष्ट्रासोबत काम करणाऱ्या भारतीय व्यक्तीची राफामध्ये मृत्यू झाला आहे. जेव्हा तो प्रवास करीत होता. तेव्हा त्याच्या गाडीवर राफामध्ये हल्ला करण्यात आला. 
 
इजरायल-हमास संघर्षामध्ये पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रच्या एखाद्या विदेशी कर्मचारीचा मृत्यू झाला आहे. मृतक भारतीय संयुक्त राष्ट्र सेफ्टी अँड सिक्योरिटी विभाग स्टाफ सदस्य होता. मिळालेल्या माहितीनुसार हा मृतक भारताचा रहिवासी आहे. तसेच तो भारतीय सेनेचा पूर्व जवान होता. 
 
या दरम्यान संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनीयो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा विभागच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू आणि एक डीएसएस कर्मचारी जखमी झालाच्या बातमीवर दुःख व्यक्त केले आहे. महासचिव एंटोनीयो गुटेरेसचे उपप्रवक्ता फरहान हक व्दारा एक जबाब मध्ये सांगितले की, एंटोनीयो गुटेरेस ने संयुक्त राष्ट्र कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची निंदा केली आणि पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली. एंटोनीयो गुटेरेस ने मृत स्टाफ सदस्याच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. 

Edited By- Dhanashri Naik