शनिवार, 28 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2024 (12:46 IST)

शेयर्समध्ये हाय रिटर्नचा शब्द देऊन ठगांनी चार कोटी घेऊन इंजिनियरला फसवले

Tension
महाराष्ट्रातील नवी मुंबईमध्ये शेयर बाजारात हाय रिटर्नचा शब्द देऊन ठगांनी एका केमिकल इंजिनियरला चार कोटींचा चुना लावला आहे. या इंजिनियरने सोशल मीडियावर चांगले रिटर्न या एका पोस्टवर दिलेल्या लिंक वर क्लीक केले. त्यानंतर या ठगांनी या इंजिनियरला आपली शिकार बनवले. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 
 
महाराष्ट्रातील नवी मुंबई इथे एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका अधिकारींनी सांगितले की केमिकल इंजिनियरला शेयरमध्ये चांगले रिटर्न चे लालच देऊन 3.7 कोटीची फसवणूक केल्याचा आरोपाखाली सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
हा 43 वर्षीय पीडित इंजिनियर वाशी परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याने सोशल मीडियावर चांगले रिटर्न या एका पोस्टवर दिलेल्या लिंक वर क्लीक केले. त्यानंतर त्या टोळीमधील एका आरोपीने इंजिनियर सोबत व्हाटसऍप चॅटिंग सुरु केली. व आपल्या जाळयात अडकवले. पीडितने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik