काश्मीर मुद्यावर बोलताना अब्बासी म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील लोकांचा संघर्ष भारत मोडीत काढत आहे. दरम्यान UNमध्ये आपल्या संपूर्ण भाषणादरम्यान अब्बासी यांनी 17 वेळा काश्मीर मुद्याचा तर 14 वेळा भारताचा उल्लेख केला. अब्बासी यांनी यावेळी असाही कांगावा केला की, पाकिस्तान देश निर्माण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून वारंवार शेजारील देशाच्या (भारत) शत्रुत्वाचा सामना करावा लागत आहे. तसंच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांची अंमलबजावणीही करत नाही.