Dharma Sangrah
✕

आता मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना नपुंसक करण्याची शिक्षा

Updated: बुधवार, 12 जून 2019 (13:27 IST)
 
या विधेयकाप्रमाणे राज्यात 13 वर्षाहून कमी वयाच्या मुलांविरुद्ध यौन शोषण आरोपींना रासायनिक औषधाचे इंजेक्शन देऊन नपुंसक करण्यात येईल. या प्रकारे कायदा तयार करणारा अमेरिकेतील हा पहिला राज्य असण्याचा दावा केला जात आहे.
 
अलबामाच्या गव्हर्नर काय इवे ने 'केमिकल कास्ट्रेशन' बिल पास केले. त्यांनी या बिलवर हस्ताक्षर करत म्हटले की कठोर अपराधांची शिक्षाही कठोर असली पाहिजे. यामुळे गुन्हेगारांच्या भीती निर्माण होईल. आता आरोपींना कुठलीही भीती नसल्यामुळे या प्रकाराचे गुन्हा वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. 
 
नवीन कायद्यानुसार दोषीला कस्टडीतून सोडण्यापूर्वी किंवा पॅरोल देण्याच्या एका महिन्यापूर्वी रासायनिक औषधाचं इंजेक्शन लावण्यात येईल. या औषधामुळे आरोपीच्या शरीरात टेस्टोस्टेरोन पैदा होणार नाही. यामुळे आरोपी पूर्णपणे नपुंसक होईल. आरोपीला किती प्रमाणात आणि कशा प्रकारे इंजेक्शन द्यावे हे कोर्टातील जज निश्चित करतील. या प्रक्रियेत होणार खर्च देखील आरोपीकडून घेण्यात येईल.
 
या प्रक्रियेत आरोपीच्या शरीरात असे काही हार्मोन सोडण्यात येतील ज्यामुळे त्याची यौन क्षमता नाहीशी होईल. गर्व्हनर यांच्याप्रमाणे हे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य वाटचाल आहे.
 
इकडे अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये रासायनिक औषधाने आरोपीला नपुंसक करण्याच्या कायद्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक समूहांनी या कायद्यावर पुनर्विचार करावा अशी अपील देखील केली आहे. नपुंसक करण्यासाठी औषध किती वेळा वापरण्यात येईल, या कायद्याचे पालन कशा प्रकारे केले जाईल तसेच काही कायदा समूहांद्वारे बळजबरी औषधाच्या वापर केल्या जाण्यावर देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
 
तसेच बाल यौन शोषण प्रकरणात या प्रकाराची शिक्षा केवळ दोन देशांमध्ये देण्यात येते. हे देश आहे- इंडोनेशिया आणि साऊथ कोरिया. या दोन्ही देशांमध्ये मुलांवर यौन शोषणाच्या प्रकरणात दोषी व्यक्तीला नपुंसक केलं जातं. द. कोरियामध्ये 2011 आणि इंडोनेशिया मध्ये 2016 मध्ये असा कायदा लागू झाला होता. इंडोनेशियामध्ये हा कायदा लागू करताना राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते की यौन हिंसा थांबवण्याच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकाराची तडजोड मान्य नाही.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

मार्को रुबियो यांची जामनगर रिफायनरीला भेट, नवीन ऊर्जा गिगा-फॅक्टरी आणि डेटा सेंटरसाठी अमेरिकी कंपन्यांसोबतच्या सहकार्यावर चर्चा

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक?

देशातील सर्वात मोठ्या जिओ आयपीओला पहिल्याच दिवशी ३.१६ पट प्रतिसाद मिळाला

पुढील लेख