1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2019 (13:19 IST)

अमेरिकेन टॉक शोमध्ये दिसणार शाहरुख खान!

shahrukh khan
बॉलीवूडच्या किंग खान शाहरुख खानची फॅन फॉलोइंग केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. त्याचे चित्रपट परदेशात देखील आवडीने बघितले जातात.
 
माहिनीनुसार शाहरुख खान प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही होस्ट आणि कॉमेडियन डेव्हिड लेटरमनच्या शोमध्ये दिसू शकतात. तथापि, सध्या अधिकृतपणे याची पुष्टी नाही केली गेली आहे.
 
डेव्हिड लेटरमनचा कार्यक्रम अमेरिकेच्या लेट नाईट शोमध्ये खूप लोकप्रिय आहे. डेव्हिडने 1982 मध्ये ‘लेट नाइट विद डेविड लेटरमॅन’ आणि ‘लेट शो विद डेविड लेटनमॅन’पासून सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 6000 हून अधिक एपिसोड शो होस्ट केले आहेत. त्याने स्टीफन कोलबर्ट, जिमी फॉलन, जिमी किमेल आणि ऑलिव्हर यासारखे लोकप्रिय शो होस्ट केले आहे.
 
शाहरुख खान शेवटी आनंद एल. रायच्या जिरो या चित्रपटात पाहिला गेला होता. यात कॅटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा देखील प्रमुख भूमिकेत होत्या. बातम्यानुसार आता तो सत्ते पे सत्ता च्या रीमेकमध्ये दिसणार आहे.