1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (17:42 IST)

अमिताभ बच्चन-शाहरुख खानने केला व्हिडिओ शूट

amitabh bachchan
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा कॅमेर्‍यावर एकत्र दिसतील. प्रत्यक्षात, दोघांनी चित्रपट 'बदला'साठी एक व्हिडिओ शूट केला आहे. अलीकडेच मुंबईत हे व्हिडिओ शूट केलं गेलं. 
 
अमिताभ बच्चन सोशल मीडिया खात्यावर त्यांच्या आगामी चित्रपटाचे निर्माते शाहरुख खानसह एक सेल्फी पोस्ट करताना म्हणाले की ते निर्माता शाहरुख खानकडे एम्प्लोइड आहे. या चित्रात, शाहरुख आणि अमिताभ दोघे एकत्र सेल्फी घेताना दिसत आहे. दोघांनी 'बदला' या सिनेमाच्या प्रचारासाठी व्हिडिओ शूट केला आहे.
 
या विशेष व्हिडिओमध्ये शाहरुख आणि अमिताभ 'बदला' बद्दल चर्चा करताना दिसतील. यापूर्वी शाहरुख आणि अमिताभ यांची जोडी वीर झारा, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, भूतनाथ या चित्रपटांमध्ये सोबत काम करून चुकले आहे. तशीच चर्चा आहे की 'बदला' मध्ये शाहरुख खान एक कॅमेओ करू शकतात, तथापि, सध्या कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही आहे. 
 
हा चित्रपट शाहरुख खानच्या रेड चिली बॅनर अंतर्गत बनविला जात आहे. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावत आहे. सुजॉय घोष यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अमिताभ आणि शाहरुख यांनी अलीकडे मुंबई स्टुडिओत शूट पूर्ण केला आहे.