बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

आर्मी ऑफिसरने लोकांकडून मागितली आर्थिक मदत, अमेरिकन सायकल रेसमध्ये भाग घेण्यास इच्छुक

सैन्य अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल भरत पन्नूने 11 जूनपासून सुरू होणाऱ्या 'रेस अक्रॉस अमेरिका' (आरएएएम) सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी लोकांकडून आर्थिक मदत मागितली आहे.
 
फक्त दोन भारतीय श्रीनिवास गोकुलनाथ आणि अमित समर्थाने जगातील सर्वात कठिण असलेली ही 4800 किलोमीटर लांब सायकल रेस पूर्ण केली आहे. या रेसमध्ये अमेरिकेच्या पश्चिमी तटा पासून पूर्वी तटापर्यंत सायकलिंग करावी लागते. त्यात भाग घेणाऱ्या सहभागींना 12 दिवसांत पूर्ण करायची असते. रेस दरम्यान सहकारी संघ देखील बरोबर असतो जो कारने प्रवास करतो, ज्यामुळे ही खूप महाग रेस बनून जाते.
 
लेफ्टिनेंट कर्नल पन्नू म्हणाले की ते या रेसद्वारे पर्यावरण वाचवण्याचा संदेश देतील. ते लोकांकडून आर्थिक मदत मागताना म्हणाले की या रेसमध्ये 45 लाख रुपये खर्च होतील. ते म्हणाले, 'मी माझे 25 लाख रुपये खर्च करत आहे आणि उर्वरित 20 लाख प्रायोजक आणि सार्वजनिक निधीद्वारे व्यवस्था करता येईल.'