अमेरिकेच्या आर्कान्सास राज्यातील जोन्सबोरो येथील क्विंटीन ब्राऊन आणि रॉडनी केल्सो यांना दोन डोक्यांचा रॅटलस्नेक त्यांच्या घराजवळच सापडला. तेथे असलेल्या एकूण तीन रॅटलस्नेक्सपैकी दोन नेहमीसारखेच होते, पण हा तिसरा मात्र वेगळा होता. त्याला दोन डोकी होती. हा दोन डोकी असलेला रॅटलस्नेक त्यांनी एका बॉक्समध्ये पकडला. त्याचे फोटो काढून त्यांनी ते फेसबुकवर...