Daily Horoscope
✕

गायीनं दिला 2 डोकी असलेल्या वासराला जन्म, बघून लोक आश्चर्यचकित झाले, म्हणाले- 'हा दुसऱ्या जगाचा प्राणी'

Updated: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (17:03 IST)
 
ही घटना ब्राझीलमधील आहे, जिथे नुकतेच एस्पिरिटो सॅंटो येथील नोव्हा वेनेसिया नावाच्या परिसरात या 'विचित्र' बछड्याचा जन्म झाला. दोन डोकी असल्याने या बछड्याला उठताही येत नाही, चालणे तर दूरच, असे बोलले जात आहे.
 
दोन डोकी असल्याने या वासराला खाण्यापिण्यातही खूप त्रास होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वासराला नीट उभे राहता येत नाही, त्यामुळे गाय म्हणजेच वासराची आई त्याला दूध पाजू शकत नाही. त्यामुळे सध्या वासरांना बाटलीतून दूध दिले जात आहे.
 
वास्तविक, वासराला नीट उभे न राहण्याचे कारण म्हणजे दोन डोकी असल्यामुळे त्याचा मेंदूही दोन असेल आणि अशा स्थितीत वासराला दोन्ही मेंदू संतुलित करता येत नाहीत. त्यामुळे त्याला ना उभे राहता येतेय ना चालता येतेय.
 
वृत्तानुसार, गायीच्या मालकाने अनेक प्राण्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना या संदर्भात माहिती दिली आहे, परंतु हे विचित्र प्रकरण पाहून डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले आहेत आणि ते वासरू जगू शकतील की नाही हे सांगू शकत नाहीत. 
 
गायीच्या मालकाने सांगितले की, हे 'विचित्र' वासरू त्यांच्या गायीचे तिसरे अपत्य आहे. याआधी जन्मलेली दोन मुले पूर्णपणे सुरक्षित होती. गाय वासरू देणार आहे याची जाणीव होती पण दोन डोक्याचे वासरू जन्माला येईल, याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. वासरू प्रथमदर्शनी पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. त्यानंतर त्यांनी घरातील इतर सदस्यांनाही बोलावून बछडा दाखविला. यानंतर ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली आणि आता या दोन तोंडी बछड्याबद्दल संपूर्ण जगाला धक्का बसला आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना दिलासा! ९९.% नावे कायम राहणार; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार

नागपूर हादरले! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जेवणाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन केले कृत्य

Operation Tiger 3.0 पोस्टर व्हायरल; महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला बळकटी! कसारा ते मनमाड दरम्यान १०,१५४ कोटी रुपये खर्चातून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारली जाणार

पुढील लेख
Show comments