ganesh chaturthi
✕

कोलकत्ताची बॅंगलोरवर जबरदस्त मात

Updated: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (00:12 IST)
 
 सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज (57) नंतर मधल्या फळीतील रिंकू सिंग (46) आणि शार्दुल ठाकूर (68) यांनी तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन करत कोलकाताची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेत आव्हानवीरांसमोर तगडे आव्हान उभे केले. शार्दुलने अवघ्या 29 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह अर्धशतक झळकावले, तर दुसऱ्या टोकाला रिंकूने त्याची पूर्ण साथ देत 33 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. तत्पूर्वी, गुरबाजने सहा चौकार आणि तीन षटकारांसह धडाकेबाज सुरुवात करून बंगळुरूच्या गोलंदाजांना आश्चर्याचा धक्का दिला. कोलकाताकडून डेव्हिड विली आणि करण शर्माने प्रत्येकी दोन बळी घेतले.
 
विजयासाठी 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चॅलेंजर्सला पहिला धक्का विराट कोहलीच्या (21) रूपाने डावाच्या पाचव्या षटकात सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बसला. त्यावेळी संघाची धावसंख्या 44 धावा होती. पुढच्याच षटकात फाफ डू प्लेसिस (23) लेगस्पिनर वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर मधली फळी ढासळली आणि एकापाठोपाठ विकेट पडू लागल्या. बेंगळुरूचे सहा फलंदाज आपली वैयक्तिक धावसंख्या दुहेरी अंकात नेण्यात अपयशी ठरले, परिणामी संघाचा लाजिरवाणा पराभव झाला.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

सारा तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त सचिन भावूक; बाप-लेकीच्या नात्याबद्दल व्यक्त केला खास संदेश

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दोन संघांची घोषणा केली

IND vs WI: टीम इंडियाने तिसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजला १४ धावांनी पराभूत केले

भारतीय कर्णधार शुभमन गिल पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यातून बाहेर

भारत दौऱ्यासाठी झिम्बाब्वे महिला संघ जाहीर

पुढील लेख
Show comments