शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (16:32 IST)

Big bug in WhatsApp व्हॉट्स अॅपमध्ये मोठा बग

Big bug in WhatsAppसध्या हॉट्स अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. यात स्टेट्स ठेवण्याचे एक नवे फिचर आले आहे. तुम्हाला तुमचे स्टेट्स कोणी पाहिले याची यादीही पाहता येते. पण, आता यात एक बग आहे याद्वारे काहीजण तुम्हाला न कळताच तुमचे स्टेट्स पाहू शकतात.
 
यावर एक बग आहे ज्याद्वारे तुम्ही कोणाचेही स्टेटस पाहू शकता आणि समोरच्या व्यक्तीला कळणारही नाही. आता तुम्ही विचार करत असाल की जर तुम्ही रीड रिसीट बंद केलीत किंवा थर्ड पार्टी अॅपने केलीत तर ही ट्रिक्स नाहीत, याशिवाय एक ट्रिक आहे ज्यामध्ये तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे स्टेटस दिसेल. आणि त्याला कळणार नाही.
 
अनेक वापरकर्त्यांना गुप्तपणे दुसऱ्याचे स्टेट्स पाहायचे असते यासाठी काहीजण नवे App डाऊनलोड करतात. पण, ही चूक तुम्ही करु नका.
व्हॉट्सअॅपच्या नियम आणि अटींनुसार, जर तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी अॅप वापरुन Whats App सोबत छेडछाड केली तर तुमचे खाते बंद होऊ शकते.
व्हॉट्सअॅपचा हा सर्वात सोपा मार्ग आहे जो तुम्हाला कोणत्याही संपर्काचे व्हॉट्सअॅप स्टेटस गुप्तपणे पाहण्याची परवानगी देतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही अधिकृत पद्धत आहे आणि ती तुम्हाला हानिकारक युक्त्या किंवा मालवेअरने भरलेल्या तृतीय-पक्ष अॅप्सवर अवलंबून राहू देत नाही.
यासाठी आणखी एक मार्ग आहे. याद्वारे तुम्ही दुसऱ्याचे स्टेट्स पाहू शकता.
इनेबल करण्यासाठी, स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला हॅम्बर्गर चिन्हावर क्लिक करा आणि सेटिंग्ज ओपन करा.आता येथे शो हिडन फाइल्सचा पर्याय सुरू करा.
फाइल्स ओपन करण्यापूर्वी, व्हॉट्सअॅपमध्ये स्टेटस टॅब उघडा जेणेकरून हे स्टेटस प्री-लोड केले जातील. यानंतर फाईल मॅनेजर अॅप ओपन करा.
अंतर्गत स्टोरेजवर खाली स्क्रोल करा. यानंतर WhatsApp फोल्डर निवडा. पुढे, मीडिया ऑप्शन ओपन करा आणि स्टेट्सवर क्लिक करा.या स्टेप्स फॉलो केल्यानंतर सोप्या पद्धतीने तुम्ही स्टेट्स पाहू शकता. कोणाला कळणारही नाही.