गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (11:05 IST)

सुमारे ८७ मिलियन युजर्सचा डेटा लिक : फेसबुक

फेसबुकच्या सुमारे ८७ मिलियन (८.७ कोटी) युजर्सचा डेटा केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने लीक केल्याची शक्यता फेसबुकने व्यक्त केली आहे. यापूर्वी हा आकडा ५ कोटी असल्याचे सांगण्यात येत होता. याबाबत फेसबुकनेच याबाबत माहिती दिली. ब्रिटनमधील राजकीय सल्लागार कंपनी असलेल्या केंब्रिज अॅनालिटिकाने गैरमार्गाने हा डेटा पळवल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे. 
 
या ८७ मिलियन युजर्सपैकी बहुतांश युजर्स हे २०१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय होते, अशी माहिती फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माइक स्क्रूफेर यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिली आहे. युजर्सचा डेटा थर्ड पार्टी अॅप डेव्हल्परपर्यंत जाऊ नये म्हणून फेसबुककडून योग्य ते पाऊल उचलले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.