गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (17:10 IST)

‘जीमेल’चं सर्व्हर डाउन, भारतासह अनेक देशांमध्ये युजर्स त्रस्त

गुगलच्या ‘जीमेल’चं सर्व्हर डाउन झालं आहे. परिणामी भारतासह अनेक देशांमध्ये युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सना ई-मेल पाठवता येत नाहीयेत. तर, काही युजर्सनी अटॅचमेंट फेल होण्याची तक्रार सोशल मीडियावर केली आहे.
 
जीमेलशिवाय गुगल ड्राइव्हमध्येही युजर्सना समस्या जाणवत आहेत. वापरकर्त्यांना फाइल शेअर करणं, तसंच अपलोड आणि डाउनलोड करणंही कठीण जात आहे. युजर्सनी याबाबत ट्विटर आणि डाउनडिटेक्टर वेबसाइटवर तक्रार केल्यानंतर आता गुगलनेही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. ‘गुगल अ‍ॅप्स स्टेटस पेज’वर याबाबत माहिती देताना, जीमेलमध्ये समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून लवकरात लवकर समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं गुगलने म्हटलं आहे.
 
भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, जपान आणि युरोपमधील काही भागांमध्ये युजर्सना ही समस्या जाणवत असल्याचं समजतंय. ई-मेल पाठवताना आणि फाइल्स अटॅच करताना बहुतांश युजर्सना अडचणी येत आहेत. काही युजर्स गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक यांसारख्या G suite सेवा वापरतानाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे.