बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 13 मार्च 2018 (15:08 IST)

आता गुगल मॅपवर मारिओ रस्ता दाखवणार

गुगलने  मारिओ डे च्या निमित्ताने एक खास सुविधा युजर्ससाठी सुरू केली आहे. आता गुगल मॅपवर मारिओ रस्ता दाखवले. यासाठी गुगलने मारिओ गेमची निर्मिती करणाऱ्या निन्टेंडो कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार, आता गुगल मॅपवर रस्ता दाखवण्याचे काम मारिओ करत आहे. या नव्या फिचरचा फायदा अॅनरॉईड आणि आयओएस हे दोन्ही युजर्स घेऊ शकतात. यापूर्वी गुगल मॅप वापरताना फोनच्या स्क्रिनवर एक चालणारा बाण दिसत असे. आता याच्या ऐवजी मारिओ आपल्या कारमध्ये बसलेला दिसेल आणि तुमचा दिशादर्शक होईल.

गुगल मॅपवर मारिओ पाहण्यासाठी  मॅप अपडेट करावा लागेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही डेस्टिनेशन पाईंट टाकाल आणि तुम्हाला एक प्रश्नचिन्ह दिसेल. असे ‘?’. यावर क्लिक करुन  मारिओ मोड अॅक्टिव्हेट करता येईल. त्यानंतर जिथे जायचे आहे तिथे मारिओ सोबतीने गुगल मॅपवर चालेल.