सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2023 (15:03 IST)

Jio Launches Rs 61 Data Pack: 61 रुपयांत जिओचा 5G डेटा

Jio Launches Rs 61 Data Pack: Reliance Jio देशातील सर्वात वेगवान 5G सेवेचा विस्तार करत आहे. देशात दररोज 5G नेटवर्क असलेल्या शहरांची संख्या वाढत आहे. आणि आता मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओने पहिला 5G डेटा पॅक लॉन्च केला आहे. हा 5G डेटा पॅक प्रीपेड वापरकर्त्यांसाठी आहे. जिओच्या नवीन डेटा पॅकची किंमत 61 रुपये ठेवण्यात आली आहे. या डेटा पॅकमध्ये Jio ग्राहकांना कोणते फायदे मिळत आहेत ते जाणून घ्या.
 
Jio Rs 61 डेटा पॅक  
रिलायन्स जिओच्या 61 रुपयांच्या डेटा पॅकची वैधता तुमच्या सक्रिय प्लॅनसारखीच आहे. या पॅकमध्ये कंपनी ग्राहकांना 6 जीबी डेटा देत आहे. हा डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. हा डेटा पॅक Rs 119, Rs 149, Rs 179, Rs 199 आणि Rs 209 च्या प्रीपेड प्लॅनसह घेता येईल.
 
जिओने अलीकडेच देशातील 10 मोठ्या शहरांमध्ये 5G नेटवर्क आणले आहे. यामध्ये आग्रा, कानपूर, प्रयागराज, मेरठ, तिरुपती, नेल्लोर, कोझिकोड, त्रिशूर, नागपूर आणि अहमदनगर यांचा समावेश आहे. Jio 5G सेवा आता देशभरातील एकूण 85 शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिओने डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात स्वतंत्र 5G सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.
 
रिलायन्स जिओ जिथे स्टँडअलोन 5G सेवा देशभरात सुरू आहे. तर Airtel 5G सेवा नॉन-स्टँडअलोन 5G वर आधारित आहे.
Edited by : Smita Joshi