Dharma Sangrah
✕

TikTok वर व्हायरल होण्यासाठी ट्रेनिंग, एका महिन्याची फी जाणून घ्या

Updated: मंगळवार, 14 मे 2019 (16:51 IST)
 
* टिक टॉकवर व्हायरलचे प्रशिक्षण कुठे मिळेल आणि त्याची फी किती?
 
एका अहवालानुसार चिनी लघु व्हिडिओ अॅप TikTok ने आपल्या कमाईचा पाठपुरावा करण्यासाठी भारतात ट्रेनिंग क्लासेस, वर्कशॉप आणि मेकअपची सुरुवात केली आहे. त्यात वापरकर्त्यांना इन्फ्लुएंसर बनणे आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे गुण शिकवले जातील. टिकटॉक च्या वर्कशॉपमध्ये सोशल मीडियावर त्वरित व्हिडिओ एडिट, व्हिडिओ तयार करणे आणि व्हायरल कसे करावे या बाबद सांगण्यात येईल. हे लोकांना सोशल मीडिया ट्रेंडबद्दल देखील माहिती देईल. 
 
दिल्लीमध्ये TikTok साठी ट्रेनिंग क्लासेज सुरू देखील झाल्या आहे. साप्ताहिक क्लाससाठी आपल्याला एका महिन्यात 7000 रुपये शुल्क भरावे लागेल. यात TikTok इन्फ्लुएंसर प्रशिक्षण देतील. प्रत्येक सत्रात 10 विद्यार्थी असतील. "सेलिब्रिटी फेस" नावाची टीम क्लासेज चालवीत आहे. सेलिब्रिटी फेसच्या एका प्रतिनिधीप्रमाणे वर्गात आपल्याला थ्योरीसह प्रॅक्टिकल देखील शिकवले जाईल. प्रतिनिधी प्रमाणे टिकटॉकवर शेअर होणारे 90 टक्के व्हिडिओ व्हायरल होत नाही. क्लासमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना टिकटॉक स्टार्ससह पोर्टफोलिओ शूट करण्याची संधी मिळेल. 
 
सेलेब्रिटी फेस नावाची ही कंपनी दिल्लीमध्ये स्थित आहे आणि आपल्या इन्फ्लुएंसरसह जयपूर, दिल्ली, भोपाळ, गुवाहाटी, कोलकाता आणि अहमदाबाद सारख्या शहरांत दिवसभर शूटिंग करत असतात. सुमारे 500 लोकांना शूटिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. 
 
प्रत्यक्षात, सोशल मीडियाने प्रमोशनचा संपूर्ण मार्गच बदलला आहे. आता पूर्वी सारखे नसून मोठ्या-मोठ्या कंपन्या त्या लोकांना शोधत आहे ज्यांचे सोशल मिडियावर चांगले फॉलोअर्स आहेत. जर TikTok वर आपले चांगले फॉलोअर्स आहेत तर आपण एखाद्या कंपनीच्या उत्पादनास प्रमोशन करून पैसे कमावू शकता.

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments