बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (12:22 IST)

काय आपल्याला माहीत आहे? Google वर हे शब्द सर्वात जास्त सर्च केले जातात

देशात Google आणि YouTube वर ऑनलाईन ब्युटी टिप्स, डेटिंग आणि हॉबीशी निगडित माहिती आणि व्हिडिओ हे गेल्यावर्षापासून 'सर्च' करण्यात येत आहे. गुरुवारी गूगलने सादर केलेल्या रिपोर्टानुसार सन 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये भारतात Matrimony पेक्षा Dating बद्दल सर्च जास्त वाढले आहे. 'मेरे निकट' संबंधित शोधामध्ये 75 टक्के आणि 'को-वर्किंग स्पेस' संबंधित शोधांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे. 
 
भारतात गूगलचे राष्ट्रीय निदेशक विकास अग्निहोत्रीने दिलेल्या माहितीनुसार, "भारतात ऑनलाईन स्पेस यापूर्वी कधीही इतका जिवंत नव्हता. भारत जगातील सर्वात वेगवान इंटरनेट डेटा वापरणारा देश बनला आहे. ऑनलाईन व्हिडिओचे वाढते प्रभाव, भाषा आणि आवाजाच्या वापरात वृद्धी, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ब्रॅण्ड आणि विपणन संबंधित लोकांसाठी ही एक संधी आहे." 
 
अहवालानुसार दरवर्षी सरासरी 4 कोटी भारतीय इंटरनेट वापरकर्ते बनतात. मेट्रो शहरांच्या तुलनेत इतर शहरांमध्ये ऑनलाईन सर्च जास्त वेगाने वाढले   आहे. तसेच इतर शहरांचे लोक विमा, सौंदर्य आणि पर्यटनाबद्दल अधिक सर्च करत आहे. Google प्रमाणे देशात ऑनलाईन व्हिडिओ पहाणार्‍या लोकांची संख्या सन 2020 पर्यंत 50 कोटी पोहोचेल. विज्ञान आणि हॉबी संबंधित व्हिडिओवर लोकांद्वारे घालवलेला वेळ 3 पटीने वाढला आहे. ब्युटी टिप्स संबंधित ऑनलाईन व्हिडिओ सन 2020 पेक्षा दुप्पट पाहण्यात आले आहे जेव्हाकी सुंदरतेबाबत सर्चमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.