Festival Posters

धन्य ते गोकुळ, अन मथुरा झाले

शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (21:12 IST)
होती अष्टमीची ती भयंकर काळरात्र,
यमुनेचं  पाणी  होतं पसरलं सर्वत्र,
पूर आला,पाण्यास  असें बहु जोर,
वादळाचे थैमान होते  रे घनघोर,
लीला तुझीच होती,हे ही  होतं ठावें,
कारागृहात तूच ,रात्रीस जन्मास यावे,
निसटल्या साखळ्या, उघडले दार,
प्रभू तुझी रे किमया  किती अपरंपार,
आलास जन्मा पोटी देवकीच्या,
छळा पासुनी रक्षिले सर्वा , भयंकर राक्षसांच्या!
धन्य ते गोकुळ, अन मथुरा झाले,
सावळे रूप मनोहारी तेथें जन्मा आले!
देउनी अर्जुना गीतेचे ज्ञान, सखोल,
जीवनामृत  च केलं तू मानवा बहाल,
जीवनाची दिशादर्शक गीता आहे,
आत्मसात करून, जीवन धन्य होत आहे!
......अश्विनी थत्ते

सर्व पहा

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

आरती बुधवारची

Parama Ekadashi Wishes in Marathi 2026 परमा एकादशी शुभेच्छा संदेश

Parama Ekadashi 2026: ११ जूनला अधिक मासातील अत्यंत शुभ 'कमला एकादशी'; व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

आरती मंगळवारची

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments