सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (17:09 IST)

मंद हसू ओठावर, विराजे बासरी..

सावळी तनु, सुग्नधी काया,
एका तेजाची, अकल्पित दुनिया,
मंद हसू ओठावर, विराजे बासरी,
एक ओढ अनावर, राधा ही बावरी,
रासलीला रचिली, यमुनेच्या तीरी,
गोप गोपिकांच्या सवे खेळला श्रीहरी,
दूध-लोणी सेवन केले फोडुनी घडा,
दुष्ट दानवास संहारुनी, शिकविला धडा,
नांदले गोकुळ, आनंदात बाल मुकुंदा सवे,
कृष्ण प्रेमी सदा हरखुनी गातील कान्हाचे गोडवे !!!
......अश्विनी थत्ते.