1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (14:03 IST)

जन्माष्टमी विशेष 2020 : श्रीकृष्णाचे साधे सोपे 4 दिव्य मंत्र जाणून घेऊ या....

/janmashtami 2020
श्रीकृष्णाचे सात अक्षरी, आठ अक्षरी आणि बारा अक्षरी मंत्र जप केल्याने सर्वात कठीण कार्य पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्ण श्री विष्णूंचे आठवे अवतार आहे. या दिवशी देव खुद्द अवतरले होते. म्हणून हा दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्री आणि पुरुष रात्री बारा वाजेपर्यंत उपवास करतात. या दिवशी देऊळात सजावट केली जाते आणि भगवान श्रीकृष्णाला झोपाळ्यात झुलवतात.
 
सर्व लोकं या दिवशी वेग वेगळ्या पद्धतीने उपासना करतात. परंतु या दिवशी या मंत्रांचा जप करणं खूप शुभ आणि कल्याणकारी मानले जाते. सात अक्षरी, आठ अक्षरी आणि बारा अक्षरी मंत्राचा उच्चार किंवा जप करण्यासाठी खूप सोपे आणि मंगळकारी आहे. मंत्र खालील प्रमाणे आहे....
 
ॐ क्रीं कृष्णाय नमः
ॐ गोकुल नाथाय नम:
ॐ नमो भगवते श्री गोविन्दाय
ॐ गोवल्लभाय स्वाहा
 
ज्या लोकांचा चंद्र कमकुवत असल्यास ते या दिवशी विशेष पूजा करून फायदा घेऊ शकता.