शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (19:08 IST)

श्रीकृष्णाने किती वेळा आपले विराट स्वरूप दाखविले होते, जाणून घेऊ या....

प्रत्येकाला हे माहीतच आहे की महाभारताचा युद्धाच्या सुरुवातीस श्रीकृष्णाने अर्जुनास आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन करविले होते. या व्यतिरिक्त हे फार कमी लोकांना माहीत असेल की कृष्णाने कोणाला आणि किती वेळा आपल्या दिव्यरूपाचे दर्शन दिले होते. चला थोडक्यात जाणून घेऊ या.
 
1 अक्रुरजींना दर्शन घडविले : अक्रुरजी जेव्हा श्रीकृष्णाला मथुरेला घेऊन जाण्यासाठी गोकुळात हे विचार करून आले होते की कृष्णाचे कंसापासून संरक्षण करावयाचे आहे. ते नेहमीच श्रीकृष्णाची कंसापासून संरक्षणाची काळजी करीत असायचे. त्यांचा कधी ही या गोष्टीवर विश्वास नसे की श्रीकृष्ण हे देव आहे जरी त्यांनी श्रीकृष्णाच्या चमत्काराच्या कित्येक कथा ऐकल्या असतील. तरी ही त्यांचा मनात शंका होतीच. मग बलराम आणि श्रीकृष्णाला मथुरेला घेऊन जाताना त्यांनी श्रीकृष्णाला आपली योजना सांगितली की कश्या प्रकारे मी आणि यादव सैन्य आपणास कंसापासून वाचविणारं. त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना म्हटलं होतं की आपणांस आमची काळजी नसावी, पण अक्रुरजींनी त्यांना लहान समजून त्यांची गोष्ट टाळली तेव्हा एकाजागी वाटेत यमुनेच्या काठी अक्रुरजींने आपल्या योजनेनुसार यमुनेत स्नान करण्यासाठी पाण्यात बुडाले तेव्हा यमुनेच्या पाण्यात त्यांना श्रीकृष्ण दिसले. हे बघून त्यांना आश्चर्य वाटले.
 
ते पाण्यातून बाहेर आले त्यांनी काठावर असलेल्या श्रीकृष्णांना रथामध्ये बघितलं त्यांना काहीच कळले नाही. त्यांना हे सगळं भ्रम वाटले. अशा प्रकारे ते दोनवेळा पाण्यात गेले, तेव्हापण असेच झाले त्यांना काहीच कळले नाही की श्रीकृष्ण एकाच वेळी दोन्ही ठिकाणी कसे असू शकतात मग ते तिसऱ्यावेळा परत पाण्यात गेले, तेव्हा कृष्णाने त्यांना पाण्यामधूनच विचारले की काका आपण इथे काय करीत आहात ? हे बघून अक्रुरजी पाण्यातच स्तब्ध राहून बघतंच राहिले मग श्रीकृष्णांनी अक्रुरजींना पाण्यातच आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन घडविले. नंतर अक्रुरजी पाण्यातून बाहेर येऊन श्रीकृष्णाच्या पाया पडले आणि म्हणाले की देव आता माझी काळजी दूर झाली. आता मला आपली कुठलीच काळजी नाही. जगाच्या संरक्षकाचे मी काय संरक्षण करणार.
2 उद्धवाला दिले दर्शन : त्याच प्रमाणे श्रीकृष्णाचा चुलत भाऊ उद्धवच्या मनात देखील शंका होती. ते नेहमीच त्यांच्याशी प्रेम आणि ज्ञानावर वाद घालत असत आणि श्रीकृष्णाला म्हणायचे की आपण गोकूळ आणि वृंदावनातील ग्वालांना आणि राधेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ठेवले आहेत. या वर श्रीकृष्णाने उद्धवाला त्याचा ज्ञानाच्या अभिमानाला नाहीसे करण्यासाठी एक पत्र घेऊन त्यांना गोकुळात पाठविले जेणे करून राधा आणि इतर ग्वालांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यातून काढून ब्रह्मज्ञान देता येईल. पण या उलट राधेने त्यांना प्रेमाचे महत्त्व समजावून सांगून त्याचे डोळे उघडले. तेव्हा उद्धवजी राधेचे नामस्मरण करीत कृष्णाकडे जातात. तेव्हा श्रीकृष्ण उद्धवला आपले विराट स्वरूपाचे दर्शन राधासह देतात.
3 राजा मुचकुंदाने केले दर्शन : जेव्हा काळयवनाने एका गुहेत कातुयुगा पासून निजलेल्या राजा मुचकुंदाला जागं केलं तेव्हा मुचकुंदाने काळयवनाला बघतातच तो भस्मसात झाला. तेव्हा श्रीकृष्णाने राजा मुचकुंदाला आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन देऊन त्यांना हिमालयेत तपश्चर्यांस पाठविले.
4 शिशुपालाने केले दर्शन : जेव्हा पांडवांच्या राजसूय यज्ञात श्रीकृष्णाच्या सर्वप्रथम पूजेचं जाहीर केलं गेलं तेव्हा त्यांचा आत्तेभावाने शिशुपालाने त्यांना देव मानण्यास नकार देऊन त्यांचे अपमान केले. तेव्हा श्रीकृष्णाने म्हटले मी तुझ्या आईस तुझे 100 गुन्हे क्षमा करण्याचे वचन दिले आहे, म्हणून सावध राहा आता पर्यंत तुझे 99 गुन्हे झाले आहेत. त्यावर देखील शिशुपाल ऐकत नव्हता तर श्रीकृष्णाने शिशुपालाचे सुदर्शन चक्राने वध केले. शिशुपालाच्या प्रेतातून त्याची आत्मा श्रीहरी यांचा सेवक जयच्या रूपात निघाली आणि त्याने श्रीकृष्णाचे विराट स्वरूपाचे दर्शन केले आणि श्रीकृष्णाने त्याला सांगितले की आता तू स्वतंत्र आहेस तू परत आपल्या स्थळी जाऊ शकतोस.
5 धृतराष्ट्राच्या सभेत : जेव्हा एकदा महाभारताच्या युद्धाच्या वेळेस श्रीकृष्ण कौरवांच्या सभेत शांती निर्माते बनून गेले असे तर दुर्योधनाने त्यांना बंदिवान करून ठार मारण्याची इच्छा केली असताना त्यांनी कौरवांच्या सभेत आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन असे घडविले की सर्वांचे डोळे त्या तेज प्रकाशामुळे मिटले गेले. आणि त्यांचा या विराट स्वरूपाचे दर्शन फक्त पितामह भीष्म, विदुर, आणि द्रोणानेच केले. इतर मंडळी डोळे असून आंधळे झाले होते, आणि दुर्योधन आणि शकुनी तर घाबरून पळूनच गेले असे.
6 अर्जुनाला श्रीहरी विराट स्वरूपाचे दर्शन घडविले : सुभद्रा घटनेच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने दोन ठिकाणी आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन अर्जुनाला घडविले होते. पहिले जेव्हा द्वारिकेत अर्जुन एका ब्राह्मणाचे तीन मुलांचे जीव वाचविण्यासाठी यमलोकात गेले असे पण तिथे त्यांना निराश व्हावे लागले तेव्हा अर्जुनाने घेतलेली प्रतिज्ञामुळे अर्जुन स्वतःला अग्नीत भस्मसात करीत असताना श्रीकृष्णाने अर्जुनास एकत्ररीत्या प्रयत्न करण्यास सांगितले आणि अर्जुनाला घेऊन सात डोंगर पार करून एका अंधाऱ्यात गुहेत घेऊन गेले आणि शेवटी त्या गुहेच्या पलीकडे अर्जुनाला श्री हरी विष्णूंनी आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन कृष्ण रूपातच घडविले. आणि श्रीकृष्णाने आपल्याच त्या अनंत स्वरूपाला नमन केले.
7 नंतर परत येताना अर्जुनाने त्यांना पुन्हा एकदा त्यांचा विराट स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा केली असताना त्यांनी अर्जुनाला दिव्यदृष्टी देऊन आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन घडविले.
8 महाभारताच्या युद्धाच्या वेळी तिसऱ्यांदा दर्शन घडविले : अर्जुनाला महाभारताच्या युद्धाच्या वेळेस मनात अनेक प्रकाराचे संशय निर्माण झालेले असताना श्रीकृष्ण अर्जुनास आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन देतात.
 
* वेबदुनियावरील दिलेल्या कोणत्याही सामग्रीच्या प्रकाशनासाठी लेखकाची / वेबदुनियाची परवानगी / मान्यता आवश्यक आहे, त्या शिवाय कोणतीही रचना किंवा लेख वापरण्यास मनाही आहे.