मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (14:42 IST)

जन्माष्टमी विशेष : श्रीकृष्णाला आवडते मावा-मिश्रीची मिठाई, वाचा ही कृती

आपणांस श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खास क्षणी दुधापासून बनवलेली मिठाई मावा-मिश्री बनवायची इच्छा असल्यास ही सोपी विधी जाणून घ्या ...
 
साहित्य : 2 लीटर दूध, 350 ग्रॅम खडीसाखर, अर्धा चमचा वेलची पूड, पिस्त्याची पूड पाव वाटी.
 
कृती : सर्वात आधी दुधाला घट्ट होई पर्यंत उकळवा. त्यात खडीसाखर मिसळून घ्या आणि घट्ट होत असलेल्या दुधाच्या रेषांना भांड्याच्या कडेला एकत्र करा. वरून वेलची पूड आणि पिस्त्याची पूड टाका.
 
दुधाला थंड करून एका ट्रे मध्ये भरून ठेवा. दुधात जेवढे रेषे असतील ते तेवढेच चविष्ट लागतं. आता दुधापासून बनलेली बनलेली मिठाई मावा-मिश्रीचा देवाला नैवेद्य दाखवा आणि घरी आलेल्या पाहुण्यांना देखील तो प्रसाद म्हणून द्या.
 
या मिठाईचे वैशिष्ट्ये असे की ही मिठाई रेफ्रिजरेटर मध्ये न ठेवता देखील किमान 2 दिवसांपर्यंत चांगली राहते.
 
टीप : दूध म्हशीचे असल्यास मावा-मिश्री चांगली बनते.