बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. झारखंड निवडणूक 2019
Written By

झारखंड विधानसभा निवडणूक: ४१ जागांसाठी बहुमत

झारखंड विधानसभेची संख्या ८१ असून राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे. सध्या झारखंडमध्ये भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनची सत्ता आहे. मात्र यावेळी त्यांना सत्ता स्थापन 
करण्यासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपला ३७ जागा मिळाल्या होत्या तर एजेएसयूला ५ जागा मिळाल्या होत्या. 
 
पोलिंग बूथमध्ये २० टक्के वाढ असून झारखंडमध्ये एकूण २.२६५ कोटी मतदार आहेत. १२ ऑक्टोबर २०१९ रोजी ही अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. राज्यात एकूण १९ जिल्ह्यांपैकी ६७ जिल्हे नक्षल प्रभावित 
आहेत. यातून १९ जिल्हे संवेदनशील असून १३ जिल्हे अति संवेदनशील आहेत.