शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 3 जानेवारी 2024 (14:34 IST)

लाइव्ह मॅचदरम्यान मुलाने गर्लफ्रेंडला केले प्रपोज

love hands
क्रिकेट स्टेडियममधील लाइव्ह मॅच दरम्यान लव्ह बर्ड्स एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसले आहेत. लाइव्ह मॅचेसमध्ये अनेकवेळा मुले गुडघ्यावर बसून आपल्या मैत्रिणींना प्रपोज करताना आढळून आले आहेत. सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात क्रिकेट स्टेडियममध्येच प्रपोज केल्याची घटना पाहायला मिळाली आहे.
 
सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग खेळली जात आहे. मंगळवारी म्हणजेच 2 जानेवारीला मेलबर्न रेनेगेड्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान एका मुलाने आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले. या जोडप्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत
 
सामन्यादरम्यान, चॅनल 7 चे होस्ट या जोडप्याकडे आले. दोघांनी वेगवेगळ्या संघांचे टी-शर्ट घातले होते. हा मुलगा मेलबर्न स्टार्सचा चाहता होता. तर मुलगी मेलबर्न रेनेगेड्सचा टी-शर्ट घालून सामना पाहण्यासाठी आली होती. दोघेही वेगवेगळ्या संघांना सपोर्ट करत होते. पण या दोघांनी ग्लेन मॅक्सवेलला आपला आवडता खेळाडू म्हणून नाव दिलं. होस्ट मुलाला मेलबर्न स्टार्सबद्दल विचारत असताना, तो मुलगा एका गुडघ्यावर खाली येतो आणि त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करतो.

मुलगा लाईव्ह टीव्हीवर येताच सर्वप्रथम तो खुर्चीवरून उठतो आणि आपल्या मैत्रिणीसमोर गुडघे टेकून बसतो. मग तो खिशातून अंगठी काढतो आणि तिला प्रपोज करतो. हे पाहून मुलीला खूप आश्चर्य वाटते. पण त्याचवेळी ती होकारार्थी मान हलवून उत्तर देते
 
मुलीने मुलाचा प्रस्ताव स्वीकारला, त्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून दोघांचे अभिनंदन केले. त्यानंतर मुलाने सर्वांसमोर मुलीच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला मिठी मारली
 
Edited by - Priya Dixit