शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (16:30 IST)

Amruta Fadnavis New Song Release: अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका आहे. अमृता पुन्हा आपल्या गाण्यामुळे चर्चेत आहे. त्यांचं एक नवीन गाणं येत आहे. त्यांनी ही माहिती सोशल मीडियावरून दिली. अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असून त्या गायिकाही आहेत. त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.त्यांचं आज नवीन गाणं रिलीज झालं आहे. 
 
अमृता यांनी आपल्या ट्विटर अकाउंट आणि इंस्टाग्राम वर पोस्ट टाकून त्यांचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे अशी माहिती दिली होती. आज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे"असे या गाण्याचे बोल आहे. हे  गाणं आज प्रदर्शित झालं आहे. टी सिरीजने या गाण्याची निर्मिती केली आहे. 
 
या गाण्यातील अमृतांचें लूक एकदम वेगळे आहे. त्यांनी गाण्यात व्हाईट टॉप आणि जीन्स आणि जॅकेट घातले आहे. त्यांनी परिधान केलेले दागिने  देखील विशेष आहे. हे गाणं पंजाबी असून बॅचलर पार्टी साठी एकदम परफेक्ट आहे. या गाण्याच्या टिझर गुरुवारी रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आज हे गाणं रिलीज झाले असून अमृतांनी हे गाणं गायलंच नसून त्या गाण्यावर थिरकल्या आहे. या व्हिडिओला अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. टी सिरीज ने गाण्याची निर्मिती केली असून मित ब्रोज यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे. प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit