सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified मंगळवार, 14 जून 2022 (18:42 IST)

वरातीत नाचताना वृद्धाचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील देवरियातुन एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी आहे. देवरिया येथे नाचताना एक वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राम निवास गिरी असे या मयत वृद्धचे नाव आहे. मयत रामनिवास हा वृद्ध व्यक्ती लग्नात ऑर्केस्ट्रा डान्सर्स बरोबर एका पिकअप व्हेनमध्ये  डान्स करताना वाहनातील लोखंडी रॉडला लटकून स्टंटबाजी करू लागला आणि त्याची पकड रॉड वरून सुटून ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. पडल्यावर त्यांना तातडीने  रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.