Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंतराळात पहिल्यांदाच टेनिसचा सामना

Updated: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (12:43 IST)
 
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि यूएस टेनिस असोसिएशनने याचे आयोजन केले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (आयएसएस) झालेल्या या खेळात कमांडर अँड्र्यू फ्युस्टल, युरोपियन स्पेस एजन्सीचे तीन फ्लाइट इंजिनियर आणि नासाच्या दोन अंतराळवीरांनी भाग घेतला. गंमत म्हणजे अंतराळ स्थानकात गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे टेनिस बॉल उसळलाच नाही. तसेच या अंतराळ स्थानकातील यंत्रसामुग्री खराब होऊ नये, यासाठी एक विशेष प्रकारचा सॉफ्टबॉल यासाठी वापरण्यात आला. अशा प्रकारे न उसळणार्‍या चेंडूने खेळणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे, असे फ्युस्टल याने या सामन्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र अखेर फ्युस्टल व त्याच्या जोडीदारानेच हा सामना जिंकला. या टेनिस खेळाचे थेट प्रसारण एका ग्लोबसारख्या शिल्पाच्या माध्यमातून करण्यात आले. न्यूयॉर्कमधील बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या बाहेर हे शिल्प लावण्यात आले. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गणेश चतुर्थीला पावसाचे पुनरागमन होणार! विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात इशारा जारी

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला

उत्तराखंडमध्ये अस्वलाच्या हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न करताना दोन महिला दरीत पडल्या, एकीचा मृत्यू

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा विस्तार केला जाणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आगामी उत्तर प्रदेश निवडणुका लढवण्याच्या तयारी

Dr. Sarvapalli Radhakrishnan Jayanti : कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन?

पुढील लेख
Show comments