शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (07:58 IST)

#MeToo महिलेने केला महिलेच शोषण, अजबच प्रकार

देशात #MeTooची लाट आलेली आहे. यामध्ये महिला आपल्यावरील अत्याच्याराविरोधात उघड बोलू लागल्या आहेत. आता #MeTooचे वादळ आलेलेल पाहायला मिळत आहे. Metooमध्ये अभिनेते नाना पाटेकर, अलोक नाथ, रजत कपूर, दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, गायक कैलाश खेर यांच्यावर महिलांनी गैरवर्तवणुकीचे आरोप केलेत. मात्र  आता MeToo विषयी एक धक्कादायक वेगळीच  बाब समोर आली आहे. एका महिलेनेचे महिलेविरोधात #Metoo असा लैंगिक छळ केला आहे. यामुळे #MeToo कँपेनमध्ये एका महिलेने महिलेवर अशा प्रकारचा आरोप केल्याची पहिलीच घटना असून, विनोदी महिला कलाकार कनिझ सुर्का हिने #MeTooच्या माध्यमातून तिची सहकारी असलेली विनोदी कलाकार आहिती मित्तल हिच्यावर #MeToo केल्याचा आरोप केलाय. आहिती मित्तल हिने एका कार्यक्रमात जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप कनिझ सुर्का हिने केला असून,  कार्यक्रमाला अनेक प्रेक्षक , विनोदी कलाकारही तिथे उपस्थित होते. तर घटनेने मी सुन्न झाले असून, खूप अपमानित देखील वाटले आहे .मात्र  माझ्याकडे पर्याय नसल्याचे कनिझ सुर्का हिने सांगितले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा असतात. त्याचे उल्लंघन केल्याचे देखील तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता हे metoo अजून किती जणांना भोवणार आहे हे पुढे दिसणार आहे.