रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 21 मे 2018 (08:48 IST)

मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात

मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात आलं  आहे. त्यामुळे रोहित शर्मासह   खेळाडूना मोठा धक्का बसला आहे.  दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून अकरा धावांनी मुंबई इंडियन्सला अखेरच्या साखळी सामन्यात  पराभव स्वीकारावा लागला   आहे.  या पराभवामुळंच मुंबईचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आले आहे.  दिल्लीनं मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं ,  दिल्लीने मुंबईचा ११ धावांनी पराभव करत स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. दिल्लीचा संघ याआधीच आयपीएलमधून बाहेर गेला आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएलचा चषक  जिंकला होता.  लमिछानेनं 36 धावांत तीन, तर मिश्रानं 19 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी रिषभ पंत आणि विजय शंकर यांच्या चमकदार फलंदाजीनं दिल्लीला चार बाद 174 धावांची मजल मारून दिली होती. पंतनं 64 धावांची, तर विजय शंकरनं नाबाद 43 धावांची खेळी केली होती ,  मुंबईच्या दोन्ही सलामीविरांना फिरकीपटूंनी बाद केले. मुंबईचे १० पैकी ६ फलंदाजांना फिरकपटूंनी बाद केले त्यामुळे मुंबईचा पराभव झाला. सूर्यकुमार, ल्युईस, किशन, कृणाल आणि हार्दिक पांड्या, पोलार्ड ही आघाडीची फळी दिल्लीच्या फिरकीमुळे आउट झाली आहे.