शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified सोमवार, 4 जून 2018 (08:32 IST)

जगात मुंबईकर सर्वाधिक तास काम करतात

मुंबईकर जगभरात सर्वाधिक तास काम करतात. ते सर्वात जास्त राबतात असे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. जगभरातल्या ७७ मोठय़ा शहरांचे  स्वीस बँक यूबीएसच्या वतीने सर्वेक्षण केल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. जिनेव्हा, ज्युरीख आणि लग्जमबर्ग ही शहरे तासाच्या हिशेबाने काम करण्यात अग्रस्थानी आहेत तर मुंबई सर्वात खाली ७६व्या क्रमांकावर आहे. मुंबईनंतर काहीरा या शहराचा नंबर लागतो. या सर्वेक्षणामध्ये यूबीएसने १५ नोकऱ्या आणि व्यवसायांचा आढावा घेतला. त्यानुसार ज्युरीख सर्वाधिक महागडे शहर ठरले. 
 
विशेष म्हणजे इतके राबूनही आणि सर्वाधिक तास काम करूनही कमवण्याच्या बाबतीत मुंबईकर मागेच आहेत. त्यांचे पगार कमीच आहेत. न्यूयॉर्कमध्ये काम करणारा कुणीही तरुण कामगार ५४ तास काम करून आयफोन खरेदी करतो. तर त्याच धर्तीवर मुंबईकरांना मात्र आयफोन खरेदी करण्यासाठी  ९१७ तास राबावे लागेल. 
 
शहर     कामाचे तास
 
मुंबई        ३,३१४.७
हनोई       २,६९१.४
मेक्सिको    २,६२२.१
नवी दिल्ली  २५११.४
बागोटा      २,३५७.८
दुबई         २,३२३
इस्तंबूल      २,३१८.६
सेऊल        २,३०७.२
मनीला       २,२८८.८
पॅरीस         १,६६२
रोम           १,५८१