बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 26 मे 2018 (09:03 IST)

वाचा, असे आहे देशात सेक्स करण्याचे प्रमाण

९० टक्के भारतीयांनी वयाच्या ३० वर्षाच्या आधीच पहिला सेक्स केलेला असतो. पुरुषांनी वयाच्या २० ते २४ या वयोगटातच पहिला सेक्स केलेला असतो असे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने म्हटले आहे. तर मुलींमध्ये हे वय १५ ते १९ वर्षे असते. भारतात आजही लहान वयातच मुलींचे लग्न केले जात असल्याने मुलींमध्ये पहिला सेक्स करण्याचे वय कमी आहे. त्यामुळे लग्नाआधी सेक्स करणाऱ्यांचे प्रमाण देशात तुलनेने कमी असल्याचे म्हटले आहे. या सर्वेक्षणासाठी जवळपास १ लाखांहून अधिक पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या.
 

भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्नानंतर सेक्सला मान्यता आहे. १५ ते २४ या वयोगटातील केवळ ११ टक्के पुरुष आणि २ टक्के महिला लग्नाआधी सेक्स करतात. यामध्येही छत्तीसगडमध्ये लग्नाआधी सेक्स करण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच २१.१ टक्के तर मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण २०.७ टक्के आहे. उत्तर भारतीय लोकांमध्ये दक्षिण भारतीयांपेक्षा सेक्स लाईफ चांगले असे यामध्ये नोंदविण्यात आले आहे. एकटे असणाऱ्या आणि तरीही सेक्स लाईफ चांगले असणाऱ्या पुरुषांमध्ये पंजाब, हरयाणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. तर एकट्या महिलांमध्ये सेक्स लाईफ चांगले असणारी राज्ये कर्नाटक आणि गुजरात ही आहेत. यामध्ये १२ टक्के पुरुष आपल्या अनौपचारीक ओळख असलेल्या महिलांबरोबर सेक्स करतात. तर ६ टक्के पुरुष सेक्स वर्करबरोबर सेक्स करतात अशी नोंद करण्यात आली आहे.