बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (16:47 IST)

मोदींना भर चौकात शिक्षा द्या राज यांची जहरी टीका

राज ठाकरे सध्या मराठवाडा दौर्यावर आहेत. यामध्ये राज सरकारवर जोरदार टीका करत असून, मनसेने नाशिकमध्ये कसे चांगले प्रोजेक्ट आणले हे सांगत असून मनसेला नवी उभारी देत आहेत. बीड येथे नरेंद्र मोदींचा नोट बंदीचा निर्णय फसला असून, नोटबंदीचा निर्णय जर चुकला तर मला चौकात उभे करून हवी ती शिक्षा द्या असे जाहीर केले होते. मग देशातील नागरिकांनी मोदींना आमच्या चौकात कधी येता याची विचारणा करणारे पत्र लिहिली पाहिजे. असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
 
मी जे जाहीर भाषणात ठोकताळे केले खरे ठरतात त्यानुसार नरेंद्र मोदी आता पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. बीड येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. मी अनेक दिवसांपासून नोटबंदी विरोधात बोलत असून, नोटबंदी झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा विरोध करणारा मी एकटा होतो. आरबीआय मधील नोटा जमा झाल्यानंतर, नोटबंधीचा निर्णय फसला हे उघड झाले आहे. मोदी कोणत्या चौकात येणार आहेत, तुम्ही आमच्या चौकत येता की बाजूच्या हे देशाने मोदींना विचारले पाहिजे. आय प्रकारे राज यांनी जोरदार टीका केली आहे.