मुस्लीम महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले
सदर महिलेचे नाव डॉ. माही तलत सिद्दिकी असे असून त्या कानपूरच्या प्रेनगर येथे राहतात. कानपूर येथील बद्री नारायण तिवारी यांनी त्यांना दोन वर्षांपूर्वी रामायणाची प्रत भेट दिली होती. रामायण वाचल्यानंतर हे महाकाव्य उर्दू भाषेत लिहावे, असा त्यांनी निर्धार केला. रामायणामध्ये शांती आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला आहे आणि ते उर्दूत लिहिल्यानंतर आपण तणावमुक्त झालो असल्याचे डॉ. सिद्दिकी यांनी म्हटले आहे. उर्दू भाषेत रामायण लिहिण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. हिंदी भाषेतील रामायणाचा भावार्थ बदलू नये, याकडे विशेष लक्ष द्यावे लागले.